लाेणार तालुक्यात ५० पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:33 AM2021-05-24T04:33:46+5:302021-05-24T04:33:46+5:30
मेहकर तालुक्यातील दाेघांचा मृत्यू मेहकर : तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असून, रविवारी आणखी दाेघांचा मृत्यू झाला आहे. भोसा, ...
मेहकर तालुक्यातील दाेघांचा मृत्यू
मेहकर : तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असून, रविवारी आणखी दाेघांचा मृत्यू झाला आहे. भोसा, ता. मेहकर येथील ५५ वर्षीय महिला व नांद्रा धांडे, ता. मेहकर येथील ५४ वर्षीय पुरुषाचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
खामगावात काेराेनाचा उद्रेक सुरूच
खामगाव : शहरासह तालुक्यात काेराेनाचा उद्रेक सुरू आहे. रविवारी आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये घाटपुरी, ता. खामगाव येथील ६० वर्षीय महिला, सुटाळा, ता. खामगाव येथील ४२ वर्षीय पुरुष, गावंढळा, ता. खामगाव येथील ५३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बुलडाणा शहरात ११३ पाॅझिटिव्ह
बुलडाणा : शहरात काेराेना संक्रमण माेठ्या प्रमाणात वाढत असून, रविवारी आणखी ११३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच तालुक्यातील हतेडी येथील ४, सातगाव २, जामठी २, शिरपूर २, सुंदरखेड येथील दाेघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. साखळी, ता. बुलडाणा येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.