चिमुकलीच्या उपचारासाठी निघालेल्या मदत फेरीला ५0 हजाराचे दातृत्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:00 AM2017-09-29T01:00:30+5:302017-09-29T01:00:38+5:30
चिखली : अवघ्या तीन वष्रे वयाच्या चिमुकलीला ब्लड कॅन्सर या जीवघेण्या आजारातून वाचविण्यासाठी शहरातील सुजाण तरुणांनी पुढाकार घेत तिच्या उपचारासाठी मदत निधी उभारण्यासाठी शहरातून काढलेल्या मदत फेरीला अवघ्या काही क्षणातच तब्बल ५0 हजाराचे दातृत्व लाभल्याने शहरवासीयांच्या संवेदना तसेच तरुणांमधील विधायक वृत्ती जागृत असल्याचे आज पहावयास मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : अवघ्या तीन वष्रे वयाच्या चिमुकलीला ब्लड कॅन्सर या जीवघेण्या आजारातून वाचविण्यासाठी शहरातील सुजाण तरुणांनी पुढाकार घेत तिच्या उपचारासाठी मदत निधी उभारण्यासाठी शहरातून काढलेल्या मदत फेरीला अवघ्या काही क्षणातच तब्बल ५0 हजाराचे दातृत्व लाभल्याने शहरवासीयांच्या संवेदना तसेच तरुणांमधील विधायक वृत्ती जागृत असल्याचे आज पहावयास मिळाले.
तालुक्यातील शेलोडी येथील ज्ञानेश्वर प्रकाश सपकाळ यांची अवघ्या तीन वर्षांची मुलगी आराध्या हिला ब्लड कॅन्सरने ग्रासले आहे. तिला या आजारातून उपचाराअंती वाचविणे शक्य आहे; मात्र तिचे वडील ज्ञानेश्वर सपकाळ यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. पुणे येथे एका कंपनीत रोजंदारीवर काम करून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. अशात आराध्याला वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यांनी औरंगाबाद ये थील धूत हॉस्पिटलमध्ये आराध्याला उपचारार्थ दाखल केले आहे. तिला या आजारातून सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी सुमारे सहा ते सात लाखांची आवश्यकता आहे. ही बाब शहरा तील तरूणांना समजताच त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेत स्व त:कडील काही रक्कम जमा करून शहरातील दानशूर नागरीकांकडे मदतफेरीच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. यास शहरातील दात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने या मदत रॅली तून ५0 हजाराचा निधी २८ सप्टेंबर रोजी जमा झाला आहे. शहरातील बसस्थानक परिसर, डी.पी.रोड, बाजार गल्ली, बाबू लॉज चौक परिसर, राजा टॉवर, चिंच परिसर, जयस्तंभ चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर आदी भागांतून ही रॅली काढण्यात आली होती. यामध्ये गजानन तारू, पवन गवारे, तुषार भावसार, चंद्रकांत जेठे, भगवान पिटकर, कैलास हळकुटे, विलास चव्हाण, नीलेश चांदोरे, मुकेश पडघान, भारत सापते, गणेश थोरवे, संतोष तारू, भारत मुलचंदानी, अजय खरपास, मिलिंद डोंगरदिवे, पवन महाडीक, सोनु सुडकर, धनंजय राजपू त, सुशील ठेंग, सागर खलसे, शुभम पडघान, अमित कोटवे, जय मोरे, शेखर देशमुख, शुभम पाटील, गोपाल तावेड, प्रिन्स जैस्वाल, सनी जाधव आदींसह मित्रमंडळींचा समावेश होता.