एटीएम नंबर विचारून ५0 हजारांनी फसवणूक
By admin | Published: October 29, 2016 02:40 AM2016-10-29T02:40:55+5:302016-10-29T02:40:55+5:30
खामगाव येथील आठवड्यातील दुसरी घटना.
खामगाव, दि. २८- : बँक अधिकारी बोलत असल्याचे फोनवर सांगत आधार नंबर व एटीएम नंबर विचारून इसमाच्या खात्यातील ५0 हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी घडली.
येथील दाळफैल भागातील रहिवासी रमेश सोनालाल आजडीवाल (वय ५0) यांना त्यांच्या मोबाइलवर फोन आला. मुंबईवरून बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगून तुमची बँक खात्याची एसएमएस सुविधा बंद झाली आहे. ती चालु करण्यासाठी तुमचा आधार नंबर व एटीएम मागील क्रमांक सांगा, असे विचारुन माहिती घेतली व खात्यातून परस्पर ५0 हजार रुपये काढले. बँकेत जावून चौकशी केली असता ही बाब निदर्शनास आली.
याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मागील तीन दिवसात शहरात मोबाइलद्वारे एटीएम नंबरची माहिती विचारुन नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी ५ हजार तर गुरुवारी शेतकर्याचे तीस हजार रुपये परस्पर काढून फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या. यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.