५0 हजारांचा गुटखा साठा जप्त; दोघांना अटक
By Admin | Published: September 12, 2016 01:58 AM2016-09-12T01:58:41+5:302016-09-12T01:58:41+5:30
मलकापूर येथे दसरखेड एमआयडीसी पोलिसांची कारवाई.
मलकापूर (जि. बुलडाणा), दि. ११: चारचाकी वाहनातून जात असलेला प्रतिबंधित ५0 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्याची कारवाई दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी १0 सप्टेंबर रोजी रात्री रणथम फाट्यानजीक केली.
एम.एच.१५ टिसी ८0३ या क्रमांकाच्या पांढर्या रंगाच्या गाडीतून पवनसिंह राजपूत (वय ३३) रा.सुटाळा ता.खामगाव व शे.रेहमान शे.चांद (वय ३४) रा.फाटकपुरा ता.खामगाव हे दोघे जण केसरयुक्त पान मसाल्याचे पाकीट घेऊन जात असल्याची माहिती दसरखेड एमआयडीसी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उपरोक्त क्रमांकाचे वाहन पकडले असता, या वाहनामध्ये ४७ हजार २५0 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा जप्त करीत दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी ११ सप्टेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाला अवगत करण्यात आले. सदर कारवाई पो.नि. संजय सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुभाष पहुरकर, नापोका दिलीप रोकडे, प्रमोद पोलाखरे, पो.कॉ. गोपाल इंगळे यांनी केली.