खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमदनगरमध्ये  अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 04:37 PM2020-05-10T16:37:35+5:302020-05-10T16:38:25+5:30

कंत्राटदाराकडून कोणतीही मदत होत नसल्याने या मजुरांना हालअपेष्टा सहन करावी लागत आहे.

51 laborers from Khamgaon taluka got stuck in Ahmednagar | खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमदनगरमध्ये  अडकले

खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमदनगरमध्ये  अडकले

googlenewsNext

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना विषाणू संक्रमनामुळे सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे राज्यासह परराज्यातील स्थलांतरीत मजुरांची चांगलीच परवड होत आहे. महाराष्ट्रातील मजूर दुसºया राज्यात तर परराज्यातील मजूर महाराष्ट्रात अडकले असतानाच,  खामगाव तालुक्यातील ५१ स्थलांतरीत मजूर अहमदनगर येथे अडकल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. कंत्राटदाराकडून कोणतीही मदत होत नसल्याने या मजुरांना हालअपेष्टा सहन करावी लागत आहे.
कोरोना विषाणू संक्रमनामुळे २३ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. या लाकडाउनमुळे राज्यातील विविध ठिकाणी स्थलांतरीत मजूर अडकून पडले असून, खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमद नगर येथील दरेवाडी मिल्ट्री कॅम्प, एमआयडीसी गेट नं.३ परिसरात गत ४० दिवसांपासून अडकलेत. त्यांच्या जवळची सर्वच संसाधन संपल्याने या मजुरांचे चांगलेच हाल होत असल्याने आमची सोडवणूक करा!, अशी प्रार्थना या मजुरांकडून केली जात आहे. गत अनेक दिवसांपासून त्रस्त झालेल्या या मजुरांनी रविवारी सकाळी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मोबाईलवर संपर्क साधून खामगाव येथे आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे.
खामगाव तालुक्यातील विविध गावातील स्थलांतरीत मजूर तसेच कामगार मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, सुरत आणि अहमदाबाद येथे वास्तव्यास आहेत. लॉकडाउनमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे अनेक मजुरांचा रोजगार हिरावला गेला आहे. अशातच पोटाची खळगी भरण्यासाठी खामगाव तालुक्यातून अहमदनगर येथे गेलेले ५१ मजूर अचडणीत सापडले आहेत.
स्थानिक प्रशासनाशी संपर्क होत नसल्याने या मजुरांचे गत काही दिवसांपासून चांगलेच हाल होत आहेत. मिल्ट्री कॅम्प सोडल्यानंतर त्यांना पुन्हा तेथे प्रवेशांची अडचण निर्माण होईल. त्यामुळे  अडकलेले मजूर चांगल्याच द्विधा मनस्थितीत सापडले आहेत.
 
कंत्राटदाराने सोडले वाºयावर!
खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमद नगर येथील मिल्ट्री कॅम्पच्या निर्माणासाठी गेले होते. दरम्यान, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कंत्राटदार तेथून निघून गेला. कोणतीही मदत मिळत नसल्याने या मजुरांची उपासमार होत आहे. खामगाव तालुक्यातील रमेश खंडारे, गणेश खंडारे, वंदना खंडारे, गोविंदा इंगळे, शितल वानखेडे, अनंत मेढे, रजनी मेढे, सुधाकर इंगळे, प्रतिभा इंगळे, तेजराव धुरंधर, ललीता धुरंधर, संजय बाम्हदे, मंदा बाम्हदे, जगन्नाथ सुरडकर, अनिता सुरडकर, मिठाराम खंडारे, मनकर्णा खंडारे, शालीग्राम हेलोडे, शशीकला हेलोडे, प्रकाश तायडे, राजू विरघट, सुरज इंगळे, भास्कर इंगळे, अशोक वाकोडे, शिला वाकोडे, श्रीकृष्ण इंगळे, रोशन वाकोडे, गौतम लांडगे, अनिता लांडगे, मुकिंदा सावळे, प्रतिभा सावळे,
मंगेश तेलंग, सविता तेलंग, आराध्या तेलंग, अशोक गवई, रंजना गवई, सिध्दार्थ इंगळे, सिमा इंगळे, तुलशीराम भोसले, संजय खंडारे, जिवन इंगळे, श्रीकांत वानखडे, अतुल गायकवाड,
मिलींद वानखेडे, दिलीप इंगळे, जनार्धन वानखडे, सुहानी मेढे, देविका मेढे, ऋतुजा इंगळे, सृष्टी खंडारे आदी स्थलांतरीत मजूर आणि त्यांचे कुटुंबिय फसले आहेत.

 
शंकर नगर, खामगाव येथील  प्रकाश तायडे यांनी मोबाईलवर अहमदनगर येथील मिल्ट्री कॅम्पमध्ये अडकल्याची माहिती दिली. मजुरांचे आधारकार्ड  आणि त्यांची नावे आणि फोटो पाठविले आहेत. खामगाव येथे परत आणण्यासाठी मदतीची अपेक्षा केली आहे. त्यानुसार खामगाव तालुका प्रशासनाशी संपर्क साधला आहे.
-जसवंतसिंग शिख
सामाजिक कार्यकर्ता, खामगाव

Web Title: 51 laborers from Khamgaon taluka got stuck in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.