स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेल्या ५१ जणांना केले स्थानबध्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 09:05 AM2020-04-02T09:05:18+5:302020-04-02T09:05:37+5:30
गुजरात आणि राजस्थानात स्थलांतरण करणाऱ्या ५१ जणांना स्थानबध्द करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: लॉकडाऊन दरम्यान गुजरात आणि राजस्थानात स्थलांतरण करणाऱ्या ५१ जणांना स्थानबध्द करण्यात आले. त्यानंतर त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले.
वाहनाची व्यवस्था नसल्याने बुधवारी सकाळी ५१ मजूर पायी रस्त्याने जात होत आहे. कोरोना विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. शनिवार २१ मार्चपासून रेल्वे आणि बस तसेच इतर खासगी प्रवासी वाहनं बंद आहेत. यापार्श्वभूमीवर पोट भरण्यासाठी दुसºया ठिकाणी, दुसºया राज्यात गेलेला मजूर मिळेल त्या वाहनाने घरी परतत आहे. बुधवारी सकाळी पायी जाणाºया ५१ मजुरांना बाळापूर नाक्या जवळून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना क्वारंटीन करण्यात आले. या मजुरांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी शहर पोलिस स्टेशनमध्ये त्यांना सोशल डिस्टन्सींग ठेवण्यात आले होते.
खामगाव शहर पोलिसांनी आतापर्यंत ६७ जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे.