पंचायत समितीच्या पथकाने पकडले ५१ टमरेल बहाद्दर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:38 PM2017-08-03T23:38:52+5:302017-08-03T23:39:31+5:30
खामगाव : जवळच असलेल्या ग्रामपंचायत शिरजगाव देशमुख व ग्रामपंचायत गोंधनापूर येथे गुडमॉर्निंग पथकाने छापा टाकत तब्बल ५१ जणांना पकडून समज देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जवळच असलेल्या ग्रामपंचायत शिरजगाव देशमुख व ग्रामपंचायत गोंधनापूर येथे गुडमॉर्निंग पथकाने छापा टाकत तब्बल ५१ जणांना पकडून समज देण्यात आली.
शासनाच्यावतीने गाव हागणदारीमुक्तीवर मोठय़ा प्रमाणात जोर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने किशोर शिंदे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड, पिंपळगाव राजा व ग्रामीण पोलीस स्टेशन खामगावच्या सहकार्याने गुडमॉर्निंंग पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाच्यावतीने ग्रामीण भागात रोज धाडसत्र सुरू आहे. दरम्यान आज ३ ऑगस्ट २0१७ रोजी पथकाने ग्रामपंचायत शिरजगाव देशमुख येथे धाड टाकुन उघड्यावर शौचास जाणार्या १८ व ग्रामपंचायत गोंधनापूर येथे ३३ लोकांना पकडले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यावेळी धाड टाकुन पकडलेल्यांना ठाणेदार यांनी समज देवून किमान ५ दिवसात शौचालय बांधकाम करण्यास सांगितले. व यापुढे जो कोणी उघड्यावर शौचास जाइल त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची उपस्थितांना माहिती दिली.
कारवाईसाठी आलेल्या पथकात जाधव, सहा. गट विकास अधिकारी, पंचायत समिती खामगाव, बोरसे, पोहेकॉ खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन व त्यांची टिम तसेच सोबतच गडाख विअपं., बाळासाहेब खरे विअआ, संजय पाटील ग्रा.से. अंभोरे, अहिरे, व बीआरसी टिम खामगाव तसेच सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.