५२ प्रकल्पांमध्ये ठणठणाट!

By admin | Published: May 9, 2017 01:57 AM2017-05-09T01:57:42+5:302017-05-09T01:57:42+5:30

‘मे हिट’चा परिणाम : प्रकल्प परिसरातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई.

52 projects baffling! | ५२ प्रकल्पांमध्ये ठणठणाट!

५२ प्रकल्पांमध्ये ठणठणाट!

Next

हर्षनंदन वाघ
बुलडाणा : यावर्षी पावसाने जिल्ह्याला दिलासा दिला होता. त्याचा फायदा पिकांना मिळाला नसला, तरी अनेक गावांतील पाणीटंचाई दूर झाली होती; मात्र ह्यमे हिटह्णमुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत, एकूण ५२ प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आजरोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९.२४ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे येणार्‍या दिवसात जिल्ह्यातील अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली होती, तर जिल्ह्यातील सर्वच जलसाठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे अनेक गावातील पाणीटंचाई दूर झाली होती; मात्र मागील एका महिन्यात या प्रकल्पातील जलसाठय़ात झपाट्याने घट झाली आहे. जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तीन मोठय़ा प्रकल्पात एका महिन्यापूर्वी १२.७२ टक्के जलसाठा होता. आता ४.४५ टक्के जलसाठा आहे. त्यापैकी खडकपूर्णा प्रकल्पात मृतसाठा शिल्लक आहे, तर पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पात एका महिन्यापूर्वी ३0.३0 टक्के जलसाठा होता. आता १७.९0 टक्के जलसाठा आहे.
याशिवाय जिल्ह्यात ८१ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये एका महिन्यापूर्वी १५.१२ टक्के जलसाठा होता. आता ८.0८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उपयुक्त ६९.३२ दलघमी साठय़ाच्या तुलनेत ८.१५ जलसाठा आहे. ही ११.९0 टक्केवारी आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी जलसाठय़ाच्या तुलनेत २.५४ दलघमी जलसाठा आहे. ही ४.२४ टक्केवारी आहे. खडकपूर्णा प्रकल्पात उपयुक्त ९३.४0 दलघमी साठय़ाच्या तुलनेत मृतसाठा शिल्लक आहे, तर काही प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे.

"या" प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा
जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत, त्यापैकी खडकपूर्णा जलसाठय़ात मृतसाठा शिल्लक आहे. मध्यम सात प्रकल्पांपैकी कोराडी प्रकल्प व लघू ८१ प्रकल्पांपैकी ५0 प्रकल्पांमध्ये केसापूर, पांग्री केसापूर, झरी, दहीद, मातला, पळसखेड भट, बोधेगाव, डोंगरशेवली, तेर्‍हारा, हराळखेड, पाटोदा, मिसाळवाडी, अंचरवाडी-१, अंढेरा, पिंपळगाव चिलमखाँ, शिवणी आरमाळ, बोरजवळा, धामधर, फत्तेपूर, जनुना, टिटवी, गांधारी, पिंपळनेर, शिवणी जाट, तांबोळा, कळप विहीर, दे.कुंडपाळ, चोरपांग्रा, अंभोरा, गुंधा, भोरखेडी संत, हिरडव संत, घनवटपूर, चायगाव, सावंगी माळी-१, पळशी, कळमेश्‍वर, पांगरखेड, कंडारी, तांदूळवाडी, आंध्रुड, मांडवा, केशवशिवणी, जागदरी, गायखेड, विद्रूपा, ब्राम्हणवाडा, करडी, मासरूळ या लघू प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे.

जून महिन्यात अनेक गावांत भीषण पाणीटंचाई
यावर्षी उष्णतेत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून, तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जात आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत असून भविष्यात अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकेत आहेत. आजरोजी जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम, ८१ लघूप्रकल्प असे एकूण ९१ प्रकल्पांमध्ये एका महिन्यापूर्वी १८.0१ टक्के जलसाठा होता. आता एकूण ९.२४ टक्के जलसाठा आहे. यावरून प्रकल्पात झपाट्याने घट होताना दिसून येत आहे.

Web Title: 52 projects baffling!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.