सुट्यांमुळे एसटीच्या ५२ फे-या रद्द!

By admin | Published: March 13, 2017 02:31 AM2017-03-13T02:31:02+5:302017-03-13T02:31:02+5:30

उत्पन्नावर परिणाम; सैलानी यात्रेसाठी अतिरिक्त फे-या.

52 vacancies due to vacations | सुट्यांमुळे एसटीच्या ५२ फे-या रद्द!

सुट्यांमुळे एसटीच्या ५२ फे-या रद्द!

Next

खामगाव, दि. १२- होळी व धूलिवंदनानिमित्त दोन दिवस सलग सुट्या आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या खामगाव आगाराला एसटीच्या ५२ फेर्‍या रद्द कराव्या लागल्या. तर रद्द करण्यात आलेल्या काही फेर्‍या सैलानी यात्रेकडे वळविण्यात आल्या.
वाढती खासगी वाहतूक, या वाहतुकीच्या तुलनेत सेवा सुविधा पुरवण्यात कमी पडत असलेली एसटी सध्या तोट्यात चालत असतानाच अशा सणासुदीला प्रवासी संख्या रोडावल्याने एसटीला फेर्‍या रद्द करण्याची वेळ येत आहे. ११ मार्च रोजी चौथा शनिवार असल्यामुळे शासकीय कार्यालयाला सुट्या होत्या, त्यामुळे शनिवारी एसटी बसेसला प्रवासी मिळाले नाही. रविवार १२ मार्चला होळी व सोमवार १३ ला रंगपंचमी असल्यामुळे या दोन दिवसाच्या सुट्यामध्ये प्रवासी मिळणार नसल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या खामगाव आगाराने दोन दिवस काही फेर्‍या रद्द केल्या. यामध्ये १३ तारखेला २0 फेर्‍या तर रंगपंचमीच्या दिवशी १३ मार्चला ३२ अशा ५२ फेर्‍या रद्द केल्या. या फेर्‍याचे जवळपास १७ हजार कि.मी. रद्द करण्यात आले. या दोन दिवसात रद्द केलेल्या फेर्‍यामुळे खामगाव आगाराला हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी मात्र एसटीच्या अधिकार्‍यांनी काही बसेस इतर मार्गावर वळविल्या. सध्या सैलानी यात्रा सुरू आहे. त्यामुळे या होळीला उपस्थित राहण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर भाविक सैलानी येथे जातात.
त्यामुळे दोन दिवस खामगाव डेपोच्या १८ बसेस सैलानी यात्रेसाठी सोडण्यात येणार आहेत. यामध्ये रविवारी ८ तर सोमवारी रंगपंचमीच्या दिवशी १0 बसेस सोडण्यात येणार आहेत. मलकापूर रेल्वे स्टेशनवरून येणार्‍या प्रवाशाची गर्दी लक्षात घेता काही बसेस मलकापूर येथून सैलानीसाठी तर काही चिखली बसस्थानकारून सोडण्यात येणार आहेत.

प्रवाशांची रोडवलेली संख्या लक्षात घेता खामगाव आगाराकडून होळी व धूलिवंदनाला १७ हजार कि.मी.चे शेड्युल प्लॅन केले आहे. या शेड्युलचा वापर सैलानी यात्रेसाठी करून आगाराचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न आहे.
-संतोष वनारे
आगार व्यवस्थापक, खामगाव

Web Title: 52 vacancies due to vacations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.