५२३ निराधारांना दिलासा

By admin | Published: August 21, 2015 11:32 PM2015-08-21T23:32:16+5:302015-08-21T23:32:16+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांचे प्रलंबित अर्ज मंजूर.

523 Relief to the destitute | ५२३ निराधारांना दिलासा

५२३ निराधारांना दिलासा

Next

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): तालुक्यातील श्रावणबाळ व संजय गांधी योजनेचे शेकडो लाभार्थ्यांचे अर्ज कित्येक वर्षापासून तहसिल कार्यालयात प्रलंबीत होते. शासनाने निराधार लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्याचा अधिकार तहसिलदारांना दिला असून, येथील तहसिलदार संतोष कणसे यांनी गत दोन दिवसात ५२३ लाभार्थ्यांचे प्रलंबीत अर्ज मंजूर केल्याने तालुक्यातील निराधारांना दिलासा मिळाला आहे. शासनस्तरावरुन निराधारांसाठी संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना यासारख्या योजना निर्माण करण्यात आलेल्या आहेत. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे अनेक निराधारांना शासनाच्या योजनेपासून वंचित रहावे लागत होते. दरम्यान शासनाने निराधार लाभार्थ्यांचे संजय गांधी, श्रावण बाळ यासारख्या योजनेचा लाभ देण्याकरीता अर्ज मंजूर करण्याचे अधिकार तहसिलदारांना दिले आहेत. येथील तहसिल कार्यालयामध्ये गेल्या वर्षभरापासून श्रावणबाळ योजनेचे ७६६ व संजय गांधी योजनेचे २८८ लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबीत होते. दरम्यान येथील तहसिलदार संतोष कणसे यांनी तहसिल कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार अनुदान समितीची बैठक घेऊन ९९४ लाभार्थ्यांपैकी ५२३ लाभार्थ्यांचे प्रलंबीत अर्ज मंजूर केले आहेत. तसेच लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यासाठी ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, १0 मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, ११ एप्रिल महात्मा ज्योतीबा फुले जयंती, १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, २७ मे रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी, २६ जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, ६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या मुहूर्तावर संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या बैठका घेण्याचा शासनाचा निर्णय आहे.

Web Title: 523 Relief to the destitute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.