जिल्ह्यात ५५ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:23 AM2021-07-04T04:23:53+5:302021-07-04T04:23:53+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील सहा, खामगाव चार, शेगाव दोन, देऊळगाव राजा एक, चिखली तीन, मलकापूर एक, लोणार २८, जळगाव ...
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील सहा, खामगाव चार, शेगाव दोन, देऊळगाव राजा एक, चिखली तीन, मलकापूर एक, लोणार २८, जळगाव जामोद सहा आणि संग्रामपूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे. दुसरीकडे मेहकर, नांदुरा आणि सिंदखेड राजा तालुक्यात तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण बाधित आढळून आला नाही.
दरम्यान, शनिवारी २४ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यासोबतच आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ८१ हजार ६१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ८६ हजार ३४ कोरोना बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
--१०८८ अहवालाची प्रतीक्षा--
तपासणी करण्यात आलेल्या १०८८ संदिग्धांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८६ हजार ८८१ झाली आहे. सध्या १८४ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६६३ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.