बुलडाणा जिल्ह्यातील ५५४ उसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रात अडकले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 06:17 PM2020-05-04T18:17:36+5:302020-05-04T18:17:45+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील ५५४ उसतोड मजूर अडकले असून त्यांना स्वगृही आणण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

554 labours from Buldana district are stranded in western Maharashtra | बुलडाणा जिल्ह्यातील ५५४ उसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रात अडकले 

बुलडाणा जिल्ह्यातील ५५४ उसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रात अडकले 

Next

बुलडाणा: पश्चिम महाराष्ट्रासह नागपुर जिल्ह्यात मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातील ५५४ उसतोड मजूर अडकले असून त्यांना स्वगृही आणण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भातील आदेशही जिल्हाधिकारी यांनी पारीत केले आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नागपूर जिल्ह्यात हे ५५४ मजूर अडकले असून लॉकडाउनमधील अटी काहीशा शिथील झाल्यानंतर आता मजुरांनाही स्वजिल्हा व स्वगृहाची ओढ लागली आहे. प्रामुख्याने २२ ते २७ एप्रिल दरम्यानच या उसतोड मजुरांना स्वगृही परत आणण्याबाबत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी अनुमती दिली होती. मात्र परराज्यातील मजुरांना त्यांच्या स्वजिल्ह्यात पाठविण्यासोबतच, नवोदय विद्यालयाचे चंबा येथे अडकलेले विद्यार्थी आणि कोटा येथील विद्यार्थ्यांना बुलडाण्यात परत आणण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्रातून नेमके किती उसतोड मजूर हे जिल्ह्यात परतले याची माहिती तहसिलदारांकडून अद्याप प्राप्त झालेली नाही. जळगाव जामोद तालुक्यातील तब्बल १९८ उसतोड मजूर हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात येत असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अडकून पडले आहेत तर नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात बाबदेव येथे असलेल्या व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्टवर सिंदखेड राजा तालुक्यातील चार आणि देऊळगाव राजा तालुक्यातील दोन असे सहा मजूर सध्या अडकून पडलेले आहेत.
पुणे जिल्ह्यातील भारे तालुक्यात येत असलेल्या राजगड, कोल्हापुरातील हातगणंगलेमधील शरद सहकारी साखर कारखाना, सांगली जिल्हतील उदगीरी शुगर अ‍ॅन्ड पॉवर लि. आणि  कांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सह. साखर कारखाना, कुडल, कागल तालुक्यातील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, सांगलीतील वाळवा तालुक्यातील राजाराम बापू पाटील सह. साखर कारखाना तथा दत्त इंड्या प्रा. लि. मिरज तसेच सातारा जिल्ह्यातील यशवंत मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात प्रामुख्याने हे उसतोड मजूर अडकून पडलेले आहेत. पाच टप्प्यात या उसतोड कामगारांना बुलडाणा जिल्ह्यात आणण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १०१, दुसºया टप्प्यात १९७, तिसºया टप्प्यात ५२, चौथ्या टप्प्यात सहा आणि पाचव्या टप्प्यात १९८ जणांना बुलडाणा जिल्ह्यात येण्याची परवानगी देण्यात आली असून यातील काहीजण स्वगृही परतत असल्याची माहिती आहे.

लोणार, जळगाव जामोदमधील ३५४ मजूर
बुलडाणा जिल्ह्यातील ११ तालुक्यातील हे उसतोड कामगार असून लोणार तालुक्यातील १५६ तर जळगाव जामोद तालुक्यातील १९८ मजूर आहेत. मोताळा तालुक्यातील ५६, खामगावमधील ६६, बुलडाण्यातील २८, चिखली-१५, मेहकर ९ संग्रामपूर एक, सि. राजातील १४ मजुरांचा यात समावेश आहे.

Web Title: 554 labours from Buldana district are stranded in western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.