५६ टक्के रेशन दुकानात धान्य मिळालेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:14 AM2017-10-23T00:14:39+5:302017-10-23T00:15:36+5:30

मेहकर: सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा मानला जातो. अनेक गोरगरीब कुटुंबसुद्धा हा सण मोठय़ा उत्साहाने साजरा करतात; मात्र यावर्षी ऐन दिवाळी सणाला जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रेशनच्या अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत.

56 percent of ration shops do not get grain! | ५६ टक्के रेशन दुकानात धान्य मिळालेच नाही!

५६ टक्के रेशन दुकानात धान्य मिळालेच नाही!

Next
ठळक मुद्देदिवाळीत हजारो गरीब अन्नधान्यापासून वंचित कर्मचारी, हमालांच्या संपाचा परिणाम

उध्दव फंगाळ । 
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा मानला जातो. अनेक गोरगरीब कुटुंबसुद्धा हा सण मोठय़ा उत्साहाने साजरा करतात; मात्र यावर्षी ऐन दिवाळी सणाला जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रेशनच्या अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत. जवळपास ५६ टक्के स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य मिळालेच नसल्यामुळे  अनेक खेडेगावात रेशनचा माल पोहचलाच नाही.
शासनाने प्रत्येक खेडेगावात स्वस्त धान्य दुकान सुरू केले आहे. या दुकानांमधून गोरगरिबांसाठी गहू, तांदूळ, साखर आदी अन्नधान्य कमी भावात उपलब्ध करून दिले आहेत. या महागाईच्या काळात रेशनची ही योजना गोरगरिबांसाठी फायदेशीर ठरत असली तरी रेशनचा पुरेपूर माल खर्‍या लाभार्थींपर्यंत पोहचत नाही. जिल्ह्यात मागील दोन वर्षांच्या काळात रेशनच्या मालाचा मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. रेशनचा माल काळा बाजारात खुलेआमपणे विकल्या जातो. हा सर्व प्रकार जिल्ह्यात सर्वत्र नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याची ओरड होत आहे. 
जिल्ह्यात एकूण १ हजार ५६७ रेशन दुकाने असून, ४ लाख ३0 हजा शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे. या माध्यमातून १७ लाख लोकांना धान्य वितरण करण्यात येते; मात्र अन्नपुरवठा कर्मचार्‍यांचा संप तसेच खामगाव येथील संबंधित ठेकेदार व हमाल यांचा संपामुळे पूर्ण जिल्ह्यात ५६ टक्के दुकानदारांना मालाचे वितरण होऊ शकले नाही.
१७ ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली होती. तर १९ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन होते. त्यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंतच जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना रेशनचा माल मिळणे गरजेचे असताना या काळात बुलडाणा जिल्हय़ातील सर्व महसूल विभागातील अन्नपुरवठा कार्यालयातील कर्मचार्‍यांचा संप सुरू होता. तसेच खामगाव येथे संबंधित ठेकेदार व हमाल यांचासुद्धा काही मागण्यासाठी संप सुरू होता. त्यामुळे खामगाव येथून संपूर्ण  जिल्ह्यात अन्नधान्याचे वेळेवर वितरण होऊ शकले नाही. तर अन्नपुरवठा कर्मचार्‍यांचा संप असल्याने दुकानदारांना मालाचे वितरण करता आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो गोरगरीब लाभार्थी रेशनच्या मालापासून वंचित राहिले आहेत. गरीबांना महागडे अन्नधान्य घेऊन दिवाळी साजरी करावी लागली आहे. 

मालाचे वितरण त्वरित व्हावे!
काही अडचणीमुळे दिवाळी सणामध्ये ज्या दुकानदारांना माल मिळाला नसेल, त्या दुकानदारांना आता तरी मालाचे वितरण करून देऊन जे गोरगरीब अन्नधान्यापासून वंचित राहिले त्यांना दिवाळी झाल्यावर मालाचे वाटप व्हायला पाहिजे, नाही तर काही दुकानदार आपल्या गावात संपूर्ण माल न नेता इतरत्र त्या मालाची विल्हेवाट लावतात व माल मिळालाच नाही, असे गावात सांगतात. त्यामुळे संबंधित गावच्या सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, दक्षता समिती आदींनी जागृत राहून आपल्या गावात अन्नधान्याचे वाटपावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

अन्नपुरवठा कर्मचार्‍यांचा संप तसेच खामगाव येथील संबंधित ठेकेदार व हमाल यांचा संप यामुळे काही दुकानदारांना मालाचे वितरण होऊ शकले नाही. तरी पण अवघ्या काही दिवसातच सर्वांना मालाचे वितरण करून प्रत्येक गावात रेशनचा माल पोहचवू.
-ए.एफ.सैय्यद, अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी,मेहकर

Web Title: 56 percent of ration shops do not get grain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.