वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ५ वे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन बुलडाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:32 PM2017-10-14T13:32:32+5:302017-10-14T13:33:02+5:30
बुलडाणा : भारतीय विचार मंच व स्थानिक व्हीजन बुलडाणा एज्युकेशन अॅन्ड वेलफेअर सोसायटी व्दारा संचालित पंकज लध्दड इन्स्टीट्युट आॅफ टेक्नोलॉजी बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने वंदनीय राष्टÑसंत तुकडोजी महाराज ५ वे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन यावर्षी पंकज लध्दड इन्स्ट्यिुट आॅफ टेक्नॉलॉजीच्या सभागृहात २६ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले. या बैठकीला संस्थेचे सहसचिव रविंद्र लध्दड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.जावंधिया, भारतीय विचार मंचाचे विदर्भ प्रांत संयोजक डॉ.सुभाष लोहे, चित्तरंजन राठी, जयप्रकाश खोत, विजयराव जोशी, डॉ.संतोष सांगळे व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
आपल्या महाराष्टÑामध्ये अनेक संत होवून गेलेत त्यामुळे आपण महाराष्टÑाला संतांची भूमी म्हणतो. संतांनी आपल्या समाजाचे प्रबोधन करून याला सर्वदृष्ट्या सक्षम बनविण्याचे मोलाचे कार्य केलेले आहे. त्यांचे राष्टÑीय, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक महत्व समजावून घेण्यासाठी अशा साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. आजच्या समाजाच्या सर्वोत्थानासाठी आपणास हे संत साहित्य समजले पाहिजे व त्यांच्या समग्र विचारांचा अभ्यास करण्यात यावा या उदात्त हेतूने गत ४ वर्षापासून वंदनीय राष्टÑसंत तुकडोजी महाराज विदर्भस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत आहे. आतापर्यंत चंद्रपूर, गोदिंया, यवतमाळ अशा जिल्ह्यांना साहित्य संमेलनाचे यजमानपद भूषविण्याचा गौरव मिळाला. यंदा व्हीजन बुलडाणा एज्युकेशन अॅन्ड वेलफेअर सोसायटी बुलडाणाचे अध्यक्ष डॉ.दिपक लध्दड यांच्या पुढाकारोन हा सम्मान बुलडाणा जिल्ह्याला मिळाला आहे. या साहित्य संमेलनाला आशिष चौबिसा, अध्यक्ष खामगाव अर्बन को. बँक हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून लाभणार आहेत आणि बुलडाणावासी या साहित्य संमेलनाला उपस्थित राहून या संधीचे सोनं करतील असा विश्वास साहित्य संमेलनाचे संयोजक रविंद्र लध्दड यांनी व्यक्त केला. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यातून साहित्य संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद द्यावा, सअे आवाहन संमेलनाचे संयोजक व भारतीय विचार मंचाचे बुलडाणा जिल्हा संयोजक प्रवीण चिंचोलकर यांनी केले आहे.