शेततळ्यांचे ६ कोटी ४२ लाखांचे अनुदान वाटप

By admin | Published: July 3, 2017 12:56 AM2017-07-03T00:56:52+5:302017-07-03T01:17:32+5:30

३ हजार ८५३ शेततळ्यांची आखणी : १ हजार ९३४ शेततळ्यांचे काम पूर्ण

6 crore 42 lakhs subsidy to the farmers | शेततळ्यांचे ६ कोटी ४२ लाखांचे अनुदान वाटप

शेततळ्यांचे ६ कोटी ४२ लाखांचे अनुदान वाटप

Next

हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी कृषी विभागाने ४ हजार ९१९ शेततळ्यांना मंजुरी दिली होती, त्यापैकी १ हजार ४४९ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, ३ हजार ८५३ शेततळ्यांची आखणी करण्यात आली आहे. तसेच शेततळ्यांचे काम पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना ६ कोटी ४२ लाख ८२ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. या शेततळ्यांचा भविष्यात शेतकऱ्यांना फायदा होणार असून, सिंचन क्षमता वाढविण्यासाठी मदत होणार आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात फरक पडला असून, कमी उत्पादनामुळे आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कृषी विभागाने सुरू केलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत शेततळे घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यावर्षी कृषी विभागाने ५ हजार शेततळे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, त्यासाठी ८ हजार १४० शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ४ हजार ९१९ अर्जाला मंजुरी दिली होती. त्यापैकी ३ हजार ८५३ शेततळ्यांची आखणी कृषी विभगातर्फे करण्यात आली. त्यात बुलडाणा तालुक्यात ३०२, चिखली तालुक्याचे ४६२, मोताळा तालुक्यात ३१०, मलकापूर तालुक्यात २७९, खामगाव तालुक्यात २८०, शेगाव तालुक्यात ३००, नांदुरा तालुक्यात २८५, संग्रामपूर तालुक्यात ५००, जळगाव जामोद तालुक्यात २९७, मेहकर तालुक्यात २६१, लोणार तालुक्यात १५६, देऊळगाव राजा तालुक्यात २०२, सिंदखेड राजा तालुक्यात २१९, असे एकूण ३ हजार ८५३ शेततळ्यांसाठी कृषी विभागाने आखणी करून दिली. त्यापैकी १ हजार ९३४ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, २७६ शेततळ्यांची कामे सुरू आहेत.

तालुकानिहाय कामे सुरू असलेली शेततळे
जिल्ह्यात यावर्षी ४ हजार ९१९ शेततळ्यांना मंजुरी दिली होती. त्यापैकी ३ हजार ८५३ शेततळ्यांची आखणी करण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार ४४९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, २७६ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. त्यात बुलडाणा तालुक्यात २३, चिखली तालुक्यात १६, मोताळा तालुक्यात ३३, मलकापूर तालुक्यात २१, खामगाव तालुक्यात ३६, शेगाव तालुक्यात १९, नांदुरा तालुक्यात २५, संग्रामपूर तालुक्यात २२, जळगाव जामोद तालुक्यात १७, मेहकर तालुक्यात १४, लोणार तालुक्यात २६, देऊळगाव राजा तालुक्यात १०, सिंदखेड राजा तालुक्यात २४ शेततळ्यांचे काम सुरू आहे.

Web Title: 6 crore 42 lakhs subsidy to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.