मागील वर्षाचे टँकरचे साठ लाख रुपये थकले
By admin | Published: May 3, 2015 02:06 AM2015-05-03T02:06:25+5:302015-05-03T02:06:25+5:30
बुलडाणा तालुक्यात ५३ गावे टंचाईग्रस्त; नवीन प्रस्तावाला अद्याप मंजुरात नाही.
बुलडाणा : टंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार्या टँकर मालकाचे अद्यापही पंचायत समितीकडे मागील दोन वर्षांपूर्वीचे सुमारे ६0 लाख रुपये थकले आहेत. निधी उपलब्ध न झाल्यामुळे सदर पेमेंट थकल्याचे सांगण्यात येते. मागील टंचाईचे पेमेंट न झाल्यामुळे की काय यावर्षीचेही नियोजन अद्याप पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी कोसोदूर पाय पीट करावी लागत आहे. बुलडाणा पंचायत समिती अंतर्गत सन २0१३-१४ या वर्षात २५ गावात पाणीटंचाई निर्माण झाली होती. या टंचाईवर मात करण्यासाठी २२ गावात २६ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या, तर एका गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. २0१२-१३ मध्ये यापेक्षाही मोठय़ा प्रमाणावर तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली हो ती. त्यावेळी अध्र्या तालुक्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. या टँकरच्या कंत्राटदाराचे दीड कोटी रुपये मागील वर्षापर्यंत थकले होते. त्यातील अर्धे पैसे प्रशासनाने आतापर्यंत दिले. अजूनही ५0 ते ६0 लाख रुपये देणे बाकी आहे त. मध्यंतरी ३५ लाख रुपयाचा टँकरचा निधी आला होता. त्याचे समायोजन करण्यात आल्याची माहिती आहे. टँकरचे बाकी असलेली रक्कम देण्यात यावी, असा तगादा संबंधीत कंत्राटदारांनी प्रशासनाकडे लावला आहे.