जिल्ह्यात आरटीईच्या ६० टक्के जागा भरल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:47+5:302021-07-14T04:39:47+5:30
शाळांचे पैसे कधी येणार राज्य शासनाने मागील तीन वर्षांपासून आरटीई परताव्याची रक्कम शाळांना दिलेली नाही, त्यामुळे ही रक्कम कधी ...
शाळांचे पैसे कधी येणार
राज्य शासनाने मागील तीन वर्षांपासून आरटीई परताव्याची रक्कम शाळांना दिलेली नाही, त्यामुळे ही रक्कम कधी मिळणार, असा प्रश्न शाळांना पडला आहे. ही रक्कम देण्यात यावी, अशी मागणी खासगी शाळा संघटनांमधून करण्यात आली आहे.
दुसऱ्यांदा मुदत वाढ
आरटीई प्रवेश घेण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली आहे. जूनमध्ये शाळा प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे. त्यावेळी प्रवेश घेण्यासाठी २० दिवसांचा वेळ देण्यात आला होता. त्यांतर शाळेत प्रवेश घेण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुुदत होती. आता २३ जुलैपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता ज्या बालकांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे, त्यांनी २३ जुलै २०२१ पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा. आरटीई प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी नंबर लागलेल्या संबंधित शाळेतच प्रवेश घ्यावेत.
सचिन जगताप, शिक्षणाधिकारी प्राथमिक.
आरटीई अंतर्गत जिल्ह्यात शाळांची नोंद - २३१
एकूण जागा - २१४२
आतापर्यंत झालेले प्रवेश - १३०२
शिल्लक जागा - ८४०
पालकांच्या अडचणी काय?
खासगी विनाअनुदानित शाळांना राज्य सरकारने आरटीई परताव्याची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे शाळा प्रवेश देण्यासाठी काही शाळा टाळाटाळ करीत आहेत. परिणामी प्रवेश घेण्यासाठी पालकांना त्रास होत आहे. मात्र शाळा प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार करण्यास पालक समोर येत नाहीत.
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी....
प्रतीक्षा यादीतील (वेटिंग लिस्ट )पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता शाळेत जाऊ नये. निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, उर्वरित रिक्त जागा करिता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्राधान्य क्रमानुसार एसएमएस प्राप्त झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. त्यांच्या करिता आरटीई २५ टक्के पोर्टलवर स्वतंत्र सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.