जिल्ह्यातील ६0 हजार ग्राहक भरतात ऑनलाइन देयक!

By admin | Published: September 14, 2016 12:59 AM2016-09-14T00:59:52+5:302016-09-14T00:59:52+5:30

गो ग्रीन-गो डिजिटलकडे वाटचाल; महावितरणच्या उपक्रमाला बुलडाणा जिल्ह्यातील ग्राहकांचा प्रतिसाद.

60 thousand customers in the district fill online payment! | जिल्ह्यातील ६0 हजार ग्राहक भरतात ऑनलाइन देयक!

जिल्ह्यातील ६0 हजार ग्राहक भरतात ऑनलाइन देयक!

Next

गिरीश राऊत
खामगाव(जि.बुलडाणा), दि. १३ : विविध क्षेत्रात अद्ययावतीकरणाचा वाढता प्रभाव असतानाच जिल्ह्यातील ६0 हजार ग्राहकदेखील वीज देयकाचा ऑनलाइन पद्धतीने भरणा करीत आहेत. यामुळे कागदासोबत श्रम व वेळेची बचत होत असून, महावितरणच्या गो ग्रीन-गो डिजिटल उपक्रमाला प्र ितसाद मिळत आहे.
धकाधकीच्या आजच्या जीवनात पैशापेक्षाही वेळेला महत्त्व आले आहे; मात्र वैज्ञानिक प्रगती झाली असतानाही सर्वत्र रांगा दिसून येतात. रांगांमध्ये लागून आपले काम पूर्ण करुन घेण्यासाठी तासनतास लागतात. यामुळे वेळेचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी एटीएम, ऑनलाइन व्यवहाराची परिभाषा आज अनेकांना पटू लागली आहे. या अद्ययावतीकरणाची अंमलबजावणी करी त बुलडाणा जिल्ह्यातील ६0 हजार ग्राहकांकडून ऑनलाइन पद्धतीने वीज देयकाचा भरणा केला जा त आहे. वेळ नसल्याच्या कारणावरून अनेकांकडून वेळेवर वीज देयकाचा भरणा न झाल्याने नाइलाजाने दंड भरला जातो. तसेच दंड भरुनही देयक भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. हे टाळण्यासाठी ग्राहक ऑनलाइन देयक भरणा करण्याला प्राधान्य देत आहेत. आज घरोघरी अँन्ड्राईड मोबाइल आले आहेत. यामुळे हे सहज शक्य होत आहे, तर महावितरणनेसुद्धा अँन्ड्राईड मोबाइलची घरोघरी असलेली उपलब्धता पाहता कर्मचारी व ग्राहकांना जोडण्यासाठी २४ तास तत्पर सेवा देण्यासाठी पाच अँप्स तयार केले असून, यापैकी चार अँप्स हे कर्मचार्‍यांसाठी तर पाचवे ग्राहकांसाठी सुरू झाले आहे. यामुळे वीज देयक मोबाइलवर पाहता येत असल्याने शेवटच्या दिवशीपर्यंंत देयकाची प्रतीक्षा करावी न लागता ठरल्यावेळेवर वीज देयक मोबाइलवर पाहता येणार आहे, तर वीज देयकाचा भरणा क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बॅकिंगद्वारा होऊ लागला आहे. कागदनिर्मितीसाठी वृक्षतोड होऊन पर्यावरणाला हानी पोहोचते. हे टाळण्यासाठी महावितरणने गो ग्रीन-गो डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास प्रतिसाद देत ६0 हजार ग्राहक ऑनलाइन पद्धतीने देयकाचा भरणा करीत असल्याने दर महिन्याला साठ हजार कागदांचा वापर कमी होत आहे. यामुळे पर्यावरण वाचविण्यासाठी मदत होत आहे. भविष्यात डिजिटल बिलिंगमुळे ऑनलाइन पद्धतीने भरणा करणार्‍यांची संख्या आणखी वाढू शकते. त्यामुळे कागदासोबतच वेळ, श्रम व पैशांची बचत होण्यास मदत होणार आहे. गत ऑगस्ट महिन्यात या ६0 हजार ग्राहकांकडून ६ कोटी ३१ लाख ५0 हजार ३९0 रुपये देयकापोटी ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आले आहेत.

ग्रामीण भागातूनही प्रतिसाद
अद्ययावतीकरणाच्या युगात संगणक साक्षरतेला महत्त्व आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ग्राहकसुद्धा संगणक साक्षर होत असल्याने ऑनलाइन देयकाचा भरणा करणार्‍यांची संख्या वाढती आहे. यामुळे वेळेअभावी देयक न भरल्या गेल्यास दंडाची रक्कमसुद्धा वाचत असल्याने ग्राहकांना सोयीचे होत आहे.


-अँप्समुळे देयक वेळेवर मिळाले नाही,ही तक्रार दूर झाली आहे. ऑनलाइन भरणा केल्यास कागदासोबतच देयक देणे, देयक भरणे यासाठीचा वेळ वाचेल. तेव्हा ग्राहकांनी अद्ययावत पद्धतीचा अवलंब करावा.
- अजय शिंदे, कार्यकारी अभियंता, वीज वितरण उपविभाग खामगाव.

Web Title: 60 thousand customers in the district fill online payment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.