३५७ जागांसाठी ६०३ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:51 AM2021-01-08T05:51:15+5:302021-01-08T05:51:15+5:30

सिंदखेड राजा : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, ३५७ जागांसाठी ६०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ...

603 candidates in fray for 357 seats | ३५७ जागांसाठी ६०३ उमेदवार रिंगणात

३५७ जागांसाठी ६०३ उमेदवार रिंगणात

Next

सिंदखेड राजा : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, ३५७ जागांसाठी ६०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तालुक्यातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, मागील निवडणुकीपेक्षा बिनविरोधचा आकडा यंदा दोनने वाढला आहे.

२०२० मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. डिसेंबरमध्ये या सर्व निवडणुकांची घोषणा झाली आणि गावागावांत निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले. जुने आणि नवख्या उमेदवारांमध्ये निवडणुकीबद्दल उत्सुकता पहायला मिळाली.

२३ ते ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आणि त्यातच चार दिवसांच्या सुट्या आल्याने शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसीलसमोर रांगा लागल्या होत्या. ३ जानेवारी रोजी अंतिम यादी जाहीर झाली असून, छाननीअंती ९६४ अर्ज दाखल झाले होते. पैकी २७६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, तर ८५ उमेदवार प्रतिस्पर्धी नसल्याने बिनविरोध निवडून आले. आता ३५७ जागांसाठी ६०३ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आहेत.

तीन ग्रामपंचायती अविराेध

मागील निवडणुकीत कंडारी ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली होती. यंदा यात अधिक दोन ग्रामपंचायतींची भर पडली असून, कंडारीसह हिवरागडलिंग व आंबेवाडी या तीन ग्रामपंचायती अविराेध झाल्या आहेत.

८५ सदस्य बिनविरोध

अविराेध झालेल्या तीन ग्रामपंचायतींचे मिळून ठिकठिकाणचे ८५ सदस्य अविराेध निवडून आले आहेत. त्याची अधिकृत घोषणा निवडणूक निकालाच्या वेळीच होणार आहे. भोसा, दत्तपूर, गारखेड, चिंचोली, सुलजगाव, मलकापूर पांग्रा, येथे प्रत्येकी २, नाईकनगर, पिंपळगाव लेंडी, पळसखेड चक्का येथे प्रत्येकी ३, पोफळ शिवणी, वसंतनगर, खामगाव, सायाळ, पिंपळ खुटा येथे प्रत्येकी ४, शेंदुर्जन, दुसर बीड, विजोरा, हनवत खेड १, भंडारी येथे ५ तर लिंगा येथे ६ सदस्य अविराेध झाले आहेत.

Web Title: 603 candidates in fray for 357 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.