६१ लाखांची रक्कम गुजरातच्या कुरिअर मालकाची

By admin | Published: August 28, 2015 12:15 AM2015-08-28T00:15:19+5:302015-08-28T00:15:19+5:30

खामगाव पोलीसांनी नोंदवला जबाब; बुधवारी स्कॉर्पिओमधून ६१ लाखांची रोकड केली होती जप्त.

61 lakhs of rupees in Gujarat's courier owners | ६१ लाखांची रक्कम गुजरातच्या कुरिअर मालकाची

६१ लाखांची रक्कम गुजरातच्या कुरिअर मालकाची

Next

खामगाव : स्कॉर्पिओमधून ६१ लाखांची रोकड शहर पोलिसांनी जप्त केल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी घडली होती. सदर रोख गुजरातमधील आंगडिया कंपनीची असल्याची कबुली आंगडिया कंपनीचे मालक ज तीनभाई पटेल यांनी शहर पोलिसांना दिली आहे. त्यामुळे रक्कम कोणाची, याबाबतचा उलगडा होत असला तरी सदर रक्कम नागपूर येथून कोणाकडून, कशासाठी आणली, याबाबतचा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रूपाली दरेकर लाखनवाडा येथून परत येत असताना खामगावनजीक त्यांनी एका स्कॉर्पिओ वाहनचालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला होता. चालकाने वाहन न थांबविता भरधाव निघून गेल्याने पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग करून पकडले. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये सीटच्या कप्प्यात रोख ६१ लाखांची रक्कम सापडली होती. त्यामुळे पोलिसांनी जितेंद्र सोलंकी व अनिरुद्ध सोलंकी या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून रोख ६१ लाख रुपये व स्कॉर्पिओ ताब्यात घेतली होती. याप्रकरणी ताब्यात असलेल्या जितेंद्र सोलंकी व अनिरुद्ध सोलंकी यांची पोलिसांनी कसून चौकशी केली अस ता, त्यांनी ६१ लाखांची ही रक्कम अहमदाबाद (गुजरात) येथील पी. उमेश आंगडिया सर्व्हिस कंपनीचे मालक जतीनभाई पटेल यांची असल्याचे सांगितले होते. जतीनभाई पटेल यांनी सदर रोकड आपल्या कंपनीची असल्याचे बयान खामगाव शहर पोलिसांना बुधवारी दिल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची जामिनावर सुटका केली. तथापि, स्कॉर्पिंंओ अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहे. रोकड कोणाची, याबाबतचा उलगडा झाला असली तरी ती नागपूरवरुन कोणाकडून व कशासाठी आणली, याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

Web Title: 61 lakhs of rupees in Gujarat's courier owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.