बुलडाणा न.प.साठी ६२ अर्ज
By admin | Published: October 28, 2016 02:45 AM2016-10-28T02:45:49+5:302016-10-28T02:45:49+5:30
उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी ६२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
बुलडाणा, दि. २७- नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याला २४ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला असून, चौथ्या दिवशी जिल्ह्यात ६२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्ह्यात नऊ नगरपालिकांमध्ये नगर परिषदेच्या निवडणुका आहेत. अर्ज दाखल करण्याच्या सुरुवातीच्या दोन दिवस एकानेही अर्ज दाखल केला नाही. तर तिसर्या दिवशी ६२ जणांनी अर्ज दाखल केला. यामध्ये बुलडाणा नगरपालिकेत नगरसेवक पदासाठी १२, तर नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. तसेच तिसर्या दिवशी घाटाखाली ५0 अर्ज दाखल दाखल करण्यात आले. नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास गती आली असून, गुरुवारी चौथ्या दिवशी घाटाखालील ५ नगर परिषदांसाठी ५0 अर्ज दाखल झाले आहेत. नगर परिषदांच्या निवडणुका २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातल्या आहेत. यासाठी नामांकन अर्ज भरण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. गत तीन दिवस नामांकन अर्ज भरणार्यांची संख्या नगण्य होती. मात्र आता नामांकन अर्ज भरण्यास गती आल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी चौथ्या दिवशी घाटाखालील पाच नगर परिषदांमध्ये एकूण ५0 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये खामगाव येथे सहा, जळगाव जामोद पाच, मलकापूर ११, शेगाव पाच, नांदुरा २३ असे ५0 जणांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत. आता नामांकन अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस उरले आहेत.