१८ सरपंच पदांसाठी ६२ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:28 AM2017-10-04T01:28:20+5:302017-10-04T01:28:43+5:30
जळगाव जामोद: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर जळगाव जामोद तालुक्यातील १८ सरपंच पदासाठी ६२ उमेदवार रिंगणात आहे. वडगाव पाटण येथील सरपंच पदासाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने हे पद रिक्त राहणार आहे. १९ ग्रामपंचायतींच्या १४१ सदस्यांपैकी ७0 सदस्य अविरोध विजयी झाले असून, ९ सदस्यांच्या जागा रिक्त राहणार आहे. उर्वरित ६२ सदस्यांसाठी १२५ उमेदवार रिंगणात आहेत.
नानासाहेब कांडलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर जळगाव जामोद तालुक्यातील १८ सरपंच पदासाठी ६२ उमेदवार रिंगणात आहे. वडगाव पाटण येथील सरपंच पदासाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने हे पद रिक्त राहणार आहे. १९ ग्रामपंचायतींच्या १४१ सदस्यांपैकी ७0 सदस्य अविरोध विजयी झाले असून, ९ सदस्यांच्या जागा रिक्त राहणार आहे. उर्वरित ६२ सदस्यांसाठी १२५ उमेदवार रिंगणात आहेत.
गोळेगाव बु. येथे सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. तर तीन सदस्य अविरोध विजयी झाले आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गाची एक जागा रिक्त राहणार असून, उर्वरित तीन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. गोळेगाव खुर्द येथे सरपंच पदासाठी दोन व पाच सदस्यांसाठी दहा उमेदवार रिंगणात आहेत. एका सदस्याची निवड अविरोध झाली असून, अनुसूचित जमातीची एक जागा रिक्त राहणार आहे. माहुली येथे सरपंच पदासाठी तीन व दोन सदस्यांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. येथील तीन सदस्य अविरोध झाले असून, अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गाच्या दोन जागा रिक्त राहणार आहे. खेर्डा खुर्द येथे सरपंच पदासाठी चार व सात सदस्य पदासाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. दोन सदस्य अविरोध विजयी झाले आहेत. वडगाव पाटण येथील सरपंच पद हे अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव होते. या पदासाठी एकही अर्ज न आल्याने हे पद रिक्त राहणार आहे. तर ६ सदस्यांच्या जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, तीन सदस्य अविरोध विजयी झाले आहेत. मडाखेड बु. येथे सरपंच पदासाठी ३ तर सहा सदस्य पदासाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. तीन सदस्य अविरोध विजयी झाले आहेत. निंभोरा बु. येथे सरपंच पदासाठी सर्वाधिक आठ उमेदवार रिंगणात आहेत. तर दोन सदस्यासाठी ४ जागांमध्ये लढत आहे. सहा सदस्य अविरोध निवडून आले असून, नामाप्र स्त्री प्रवर्गाची एक जागा रिक्त आहे. मडाखेड खुर्द येथे सरपंच पदासाठी दोघांमध्ये सरळ सामना आहे. तर सदस्य पदाच्या सर्व सातही जागा अविरोध विजयी झाल्या आहेत. पळसखेड येथेसुद्धा सरपंच पदासाठी दोघांमध्ये सरळ सामना असून, येथील सदस्यपदाची अनुसूचित जातीची एक जागा रिक्त असून, उर्वरित सर्व सहा जागा अविरोध झाल्या आहेत. गाडेगाव बु. येथे सरपंचासाठी दोन व तीन सदस्यासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत तर चार सदस्य अविरोध झाले आहेत. टाकळी पारसकर येथे सरपंचासाठी दोघांमध्ये सरळ सामना होणार आहे.
सरपंच पदाचे सरळ व बहुरंगी सामने
गोळेगाव बु., गोळेगाव खुर्द, मडाखेड खुर्द, पळसखेड, गाडेगाव बु., टाकळी पारस्कर, बोराळा बु. व बोराळा खुर्द या आठ गावांच्या सरपंच पदासाठी दोन उमेदवारांमध्ये सरळ सामना आहे तर सर्वाधिक आठ उमेदवार निंभोरा बु. येथे रिंगणात आहे. पळशी वैद्य, हिंगणे बाळापूर व सातळी या तीन गावांच्या सरपंचपदासाठी सहा- सहा उमेदवार रिंगणात आहे तर खेर्डा खुर्द व भेंडवळ खुर्द येथे चार-चार तर मांडवा, झाडेगाव, मडाखेड बु. व माहुली येथे सरपंचासाठी त्रिकोणी संघर्ष होणार आहे.