खामगावातील आदर्श दिव्यांग मतदान केंद्रात ६२ टक्के मतदान
By अनिल गवई | Published: April 26, 2024 06:09 PM2024-04-26T18:09:49+5:302024-04-26T18:10:27+5:30
जी.वी. मेहता विद्यालयातील दिव्यांग केंद्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६२ टक्के मतदान झाले.
खामगाव: खामगाव लोकसभा मतदार संघातील ३१९ मतदान केंद्रांपैकी खामगाव शहरात ७६ मतदान केंद्र आहेत. यापैकी काही मतदार संघ आदर्श मतदान केंद्र म्हणून तयार केले आहेत. जी.वी. मेहता विद्यालयातील दिव्यांग केंद्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६२ टक्के मतदान झाले.
खामगाव शहरातील जी.वी.मेहता नवयुग विद्यालयात दिव्यांग कर्मचार्यांसाठी आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले. या केंद्रांची संपूर्ण जबाबदारी दिव्यांग कर्मचार्यांनी सांभाळली. येथे केंद्राध्यक्ष म्हणून उमाकांत कुळकर्णी, मंगेश पवार, प्रकाश भगत, राजेंद्र निर्मळ यांनी काम पाहिले. या केंद्रावर मतदारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सावलीसाठी मंडपही उभारण्यात आला होता. तसेच मतदारांच्या स्वागतासाठी आकर्षक स्वागत कमानही उभारण्यात आली होती.
पाच वाजेपर्यंत ६२ टक्के मतदान
जी.वी.मेहता विद्यालयातील दिव्यांग मतदान केंद्रावर सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकुण ६४७ मतदारांपैकी ४०० मतदान झाले. यात २१४ पुरूषांनी तर १८६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.