६२ टक्के विद्यार्थ्यांना नव्या पुस्तकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:37 AM2021-08-19T04:37:55+5:302021-08-19T04:37:55+5:30
सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तिवेतनाची प्रतीक्षा बुलडाणा : जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना जुलै २०२१ चे सेवानिवृत्त वेतन १७ ऑगस्टनंतरही ...
सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तिवेतनाची प्रतीक्षा
बुलडाणा : जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना जुलै २०२१ चे सेवानिवृत्त वेतन १७ ऑगस्टनंतरही मिळाले नाही. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक संकटात सापडले आहेत. खासगी शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना नियमांप्रमाणे ३०, ३१ किंवा १ तारखेपर्यंत निवृत्तिवेतन मिळते. निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या शिक्षकांना निवृत्तिवेतनासाठी प्रतीक्षा करावी लागते. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत तातडीने निवृत्तिवेतन देण्याची मागणी प्रतापराव सपकाळ व एन. एस. कमळकर यांनी केली आहे.
पाच हजार वृक्षलागवडीस प्रारंभ
माेताळा : सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत वृक्षाराेपण करण्यात आले. तालुक्यातील सिंदखेड येथे १५ ऑगस्ट राेजी बांबू लागवडीस प्रारंभ करण्यात आला आहे.
जनजागृती करण्याची गरज
बुलडाणा : सध्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये व्हायरल फिव्हरची साथ सुरू आहे. त्यामुळे, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आराेग्य विभागाने ग्रामीण भागात जनजागृती करण्याची गरज आहे.