तूर खरेदीसाठी ६२२ शेतकºयांनी केली नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2017 01:37 PM2017-05-20T13:37:39+5:302017-05-20T13:37:39+5:30
१६०० क्विंटलचे झाले मोजमाप
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड
मार्फत तूर खरेदी १७ मे पासून सुरु झाली असून, तालुक्यातील ६२२
शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. त्यांना टोकन नंबर देवून तूर मोजण्यात
येत असून, १२५ शेतकऱ्यांची १६०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला ३१ मे पर्यंत तूर खरेदी करण्याचे नविन
आदेश दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नव्याने आदेश
काढून तूर खरेदीला परवानगी दिली. शेतकऱ्यांच्या घरातील संपूर्ण तूर खरेदी
करुन त्यांना दिलासा देण्याचे काम शासन करीत आहे. तूर खरेदीच्या वेळी
येथे गोंधळ झाला होता. यानंतर गोंधळ होऊ नये म्हणून तहसिलदार संतोष कणसे
यांनी नाव नोंदणी करुन टोकन देवून शेतकऱ्यांची तूर मोजून घेण्यासाठी,
महसूलचे कर्मचारी नजर ठेवून आहेत. आ.डॉ.शशिकांत खेडेकर आणि भाजपा जिल्हा
उपाध्यक्ष यांनी वेळोवेळी तूर खरेदी केंद्राला भेट देवून होणाऱ्या
गोंधळावर प्रशासकांची कानउघडणी केली. त्यानंतर १० मे पर्यंत मार्केट
यार्डात असलेली तूर खरेदी करण्यात आली. वेळोवेळी तूर खरेदीवर भाजपा आणि
सेना पदाधिकाऱ्याांनी लक्ष देवू शेतकऱ्यांविषयी अस्मिता जोपासली असतांना
काँग्रेसच्या केलेला रास्ता रोको म्हणजे वराती मागून घोडे नाचविण्याचा
प्रकार असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या घरात तुरीचा दाणा असेपर्यंत तूर खरेदी केली जाईल, असा शब्द
मुख्यमंत्र्यांनी देवून पुन्हा दुसऱ्या टप्प्यात तूर खरेदी करणे सुरु केले
आहे. ६२२ पैकी १३२ शेकऱ्यांची तूर मोजून घेण्यात आली. मोजणी सुरु असताना
१९ मे रोजी दुसरबिड येथे रास्तारोको करुन तूर खरेदी सुरु करा, ही
काँग्रेसची मागणी म्हणजे वराती मागून घोडे नाचविण्याचा प्रकार होय.
- विनोद वाघ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष