जिल्ह्यात ६३० कोरोना पॉझिटिव्ह, ५ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:35 AM2021-04-01T04:35:12+5:302021-04-01T04:35:12+5:30
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील ३६६ व रॅपिड टेस्टमधील २६४ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील ३८७ तर रॅपिड टेस्टमधील ...
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील ३६६ व रॅपिड टेस्टमधील २६४ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील ३८७ तर रॅपिड टेस्टमधील ३ हजार ५३६ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ३ हजार ९२३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे आहेत. बुलडाणा शहर ६५, बुलडाणा तालुका : सुंदरखेड २, रायपूर १, डोंगरखंडाळा १, पाडळी २, सागवन ३, येळगाव १, देऊळघाट १, खामगाव शहर ६५, खामगाव तालुका : सजनपुरी ३, पिंपळगावराजा ६, हिंगणा १, पिंप्री कोरडे ४, गणेशपूर १, शिरसगाव देशमुख १, जळका २, राहुड १, पळशी १, आमसरी ३, आडगाव १, टेंभुर्णा १, घाटपुरी ९, पारखेड १, ढोरपगाव २, बोरजवळा १, सुटाळा ७, गोंधनपूर १, शेगाव शहर ८, शेगाव तालुका : गव्हाण १, पहुरजिरा १, जळगाव जामोद शहर ११, जळगाव जामोद तालुका : वडशिंगी ५, काजेगाव ३, सावरगाव १३, खेर्डा बु. ७, रुधाना १, जामोद १, आसलगाव ५, वाडी खुर्द २, पिंपळगाव काळे १, सुलज २, उटी खुर्द ४३, धानोरा १, संग्रामपूर शहर ३, संग्रामपूर तालुका काटेल ८, खिरोडा १, रोहणा १, टुनकी १, पातुर्डा १, वरवट ३, काकडेश्वर १, कोलद १, एकलारा १, सायखेड १, बोरखेड १, बावनबीर १, सगोडा १, सोनाळा ३, उकडगा १, कथरगाव १, मनार्डी १, असोदा १, काकनवाडा १, बोडखा १, वानखेड २, चिखली शहर २१, चिखली तालुका : मंगरूळ नवघरे २, अमडापूर १, सवणा १, एकलारा ३, मुरादपूर १, खैरव १, मालखेड २, गांगलगाव १, चंदनपूर १, शेलगाव आटोळ १, करवंड १, माळविहीर १, मोताळा शहर ४, मोताळा तालुका सांगळद २, रोहीणखेड २, अंत्री १, बोराखेडी ४, पोफळी २, काबरखेड २, कोथळी ४, खरबडी १, आव्हा २, धामणगाव दे. २, परडा ३, शिरवा १, धामणगाव बढे २, शेलापूर ३, पिंप्री गवळी २, मेहकर शहर १२, मेहकर तालुका अंजनी खुर्द १, अंत्री देशमुख १, डोणगाव २, लव्हाळा १, लोणी गवळी १, उकळी १, नांदुरा शहर १०, नांदुरा तालुका : निमगाव २, सावरगाव ५, अवधा २, खुमगाव ८, नवीन येरळी १, वडाळी १, धाडी खु १, भोरवट १, पातोंडा १, चांदूरबिस्वा १, खैरा १, टाकरखेड १, मलकापूर शहर २८, मलकापूर तालुका दसरखेड १९, धरणगाव १, कुंड बु. ६, दुधलगाव १, दाताळा १, पिंपळखुटा १, घिर्णी १, नरवेल ५, विवरा २, देऊळगावराजा शहर ३३, देऊळगावराजा तालुका : गारखेडा १, असोला जहा १, जांभोरा २, चिंचाली बु. १, सावखेड भोई २, तुळजापूर १, टाकरखेड भागीले १, गिरोली खुर्द १, देवखेड १, दगडवाडी १, निमखेड १, सातेगाव २, मंडपगाव १, नागणगाव १,जळगाव १, दे. मही १, सिंदखेडराजा शहर १०, सिंदखेडराजा तालुका : किनगावराजा १, पिंपळगाव २, सोयंदेव ४, देवखेड १, सवडत ३, भोसा १, शेंदुर्जन २, आंबेवाडी १, शिवणी १, उगला १, कडपंची १, वाघोरा २, पळसखेड १, मलकापूर पांग्रा १, दुसरबीड ३, हनवतखेड १, शिंदी १, कंडारी १, लोणार शहर १, लोणार तालुका : महारचिकना १, गनपूर १,देऊळगाव कोळ १, पळसखेड जहा. २, वढव २, परजिल्हा अकोला १, कुऱ्हा
(ता. मुक्ताईनगर) १, जाफ्राबाद (जि. जालना) २ संदिग्ध व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात ६३० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखली तालुक्यातील महीमळ येथील ६५ वर्षीय व ७८ वर्षीय पुरुष, नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ७९ वर्षीय महिला, खामगाव येथील ७४ वर्षीय पुरुष, वालसावंगी (ता. भोकरदन, जि. जालना) येथील ६८ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोविड निदानासाठी ३ हजार १९६ नमुने घेण्यात आले आहेत. तसेच विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून ८८६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत ३१ हजार ९९० कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ९९० आहे.
आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल २ लाख १८ हजार ७१३ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ३७ हजार ७४४ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ३१ हजार ९९० कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ५ हजार ४९४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत २६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.