६३९ जणांनी घेतला कोविड लसीकरणाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:14 AM2021-09-02T05:14:12+5:302021-09-02T05:14:12+5:30

जि.प. अध्यक्षा मनीषा पवार यांच्या हस्ते फीत कापून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच विश्वनाथ हिवराळे, पं.स. सदस्या ...

639 people benefited from covid vaccination | ६३९ जणांनी घेतला कोविड लसीकरणाचा लाभ

६३९ जणांनी घेतला कोविड लसीकरणाचा लाभ

Next

जि.प. अध्यक्षा मनीषा पवार यांच्या हस्ते फीत कापून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच विश्वनाथ हिवराळे, पं.स. सदस्या रुख्मिनाबाई उबाळे हे उपस्थित होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील चव्हाण, डॉ.सुरज ठाकरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल बाजड, डॉ. धनश्री राऊत, डॉ.स्नेहा गडाख, डॉ.कोमल चव्हाण, आरोग्य सहायक बबनराव काकडे, डाबेराव, देवकर, आरोग्य सहायिका सौ. अरुणा दाभाडे, सौ.मनीषा जेऊघाले, आरोग्यसेवक अवचार, जाधव, गाढवे, शेख आतिक, आरोग्यसेविका सुवर्णा बेलसरे, कमल पदमने, इंगोले, दांडगे, डाखोरे,निकम, गटप्रवर्तक सौ.रहाटे, सुरजुसे यांच्या टीमने दिवसभर लसीकरणाचे काम पाहिले. यावेळी सायंकाळपर्यंत ६३९ जणांना लस देण्यात आली. कोविडविषयी नियमांचा विसर पडल्याने केरळसारख्या राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला आहे. शिथिलता मिळताच सर्वांनाच कोरोनाचा विसर पडला आहे. त्यामुळे सॅनिटायझरचा वापर तसेच तोंडावरील मास्क गायब झालेले पाहावयास मिळत आहे. ही सर्व लक्षणे म्हणजे आपण एक प्रकारे कोरोनाला निमंत्रण देत असल्याचे दिसत असून कोरोना अद्याप संपलेला नाही, त्यामुळे आपण कोरोनाविषयी खबरदारी घेण्याची गरज आहे, असे यावेळी जि.प. अध्यक्षा मनीषा पवार यांनी बोलताना सांगितले आहे.

या लसीकरण शिबिराच्या यशस्वितेसाठी सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र बोंडगे, उपप्राचार्य डी.आर.माळी, पर्यवेक्षक अशोक खोरखेडे, जी.एम.जाधव, गजानन करदळे, मदन अंभोरे, नामदेव राठोड, ग्रामविकास अधिकारी डी.टी.तांबारे, ग्रा.पं.कर्मचारी श्रीराम इंगळे, रोजगारसेवक विजय राऊत यांच्यासह इत्यादींनी परिश्रम घेतले.

310821\3639img_20210831_220742.jpg

शिबीराचे उद्घाटन करताना सौ.मनिषा पवार

Web Title: 639 people benefited from covid vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.