१८ जागांसाठी ६५ उमेदवार रिंगणात
By admin | Published: May 15, 2015 11:17 PM2015-05-15T23:17:12+5:302015-05-15T23:17:12+5:30
बुलडाणा कृउबास निवडणूक उमेदवारांना चिन्हांचे वाटप, निवडणुकीत चुरस.
बुलडाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काल १४ मे रोजी १३३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणात ६५ उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. आज शुक्रवार १५ मे रोजी उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रणधुमाळीला खर्या अर्थाने सुरुवात झाली आहे. ही निवडणूक शिवसेना व भाजप वेगवेगळे लढत असून, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्नित लढत असल्याचे दिसत आहे. पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविल्या जात नसल्याने या निवडणुकीला सध्यातरी राजकीय रंग लागला नाही. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती ११ ऑक्टोबर १९९९ साली झाल्यानंतर काँग्रेसच्या ताब्यात बाजार समिती होती. त्यानंतर राष्ट्रवादी , काँग्रेस यांची सत्ता राहिली आहे. दरम्यान, प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे यावेळची निवडणूक ही चुरशीची होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.