बुलडाणा तालुक्यात ६५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:36 AM2021-05-11T04:36:34+5:302021-05-11T04:36:34+5:30

रेमडेसिविरच्या विक्रीचा गोंधळ बुलडाणा : जिल्ह्यात रेमडेसिविरच्या विक्रीचा गोंधळ सरता सरत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या रेमडेसिविरचा तुटवडा असून ...

65 positive in Buldana taluka | बुलडाणा तालुक्यात ६५ पॉझिटिव्ह

बुलडाणा तालुक्यात ६५ पॉझिटिव्ह

Next

रेमडेसिविरच्या विक्रीचा गोंधळ

बुलडाणा : जिल्ह्यात रेमडेसिविरच्या विक्रीचा गोंधळ सरता सरत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या रेमडेसिविरचा तुटवडा असून त्यात काही जणांकडून जादा दराने त्या इंजेक्शनची विक्री होत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची आर्थिक पिळवणू होत असल्याचे दिसून येते.

वादळाचा तडाखा, वृक्ष उन्मळून पडले

मेहकर : तालुक्यातील शहापूर, उमरा देशमुख, मोळा, मोळी या परिसरात सोमवारी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. त्यामुळे रस्त्यालगतचे अनेक वृक्ष उन्मळून पडले होते. वादळासह काही भागात तुरळक पाऊसही झाला. या वादळामुळे अनेकांच्या घरावरचे छतही उडाल्याने नुकसान झाल्याच्या घटना मेहकर तालुक्यात झाल्या आहेत.

अतिरिक्त दुधाचे करायचे काय?

सिंदखेड राजा : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा फटका दूध विक्रेत्यांना बसत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सिंदखेड राजा तालुक्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे आता अतिरिक्त दुधाचे करायचे काय, असा प्रश्न दूध विक्रेत्यांमधून उपस्थित होत आहे.

रेशनसाठी अडवणूक

बुलडाणा : आधी कोरोना चाचणी, नंतरच रेशन, अशी अट काही दुकानदार घालत आहेत; परंतु कोरोना चाचणी करण्यासाठी तशी सुविधा कुठे दिसून येत नाही. त्यामुळे रेशनसाठी लाभार्थ्यांची अडवणूक होत आहे.

लग्न सोहळ्यांवर कोरोनाचे ग्रहण

बीबी : तुळशी विवाहानंतर ग्रामीण भागात लग्न समारंभांना सुरुवात झाली. मात्र, यावर्षी सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातल्याने लग्न सोहळ्यांना ग्रहण लागले आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पडत आहेत. वधुपित्याचा खर्च कमी झाला आहे.

बुलडाण्याचे तापमान ३६ अंश सेल्सिअस

बुलडाणा : एप्रिल संपताच सूर्याने आपला रंग बदलायला सुरुवात केली आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. दुपारी उकाड्यात प्रचंड वाढ होत असल्याने घामाच्या धारा लागतात. दरम्यान, सोमवारी बुलडाण्याचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

सकाळच्या वेळी खरेदीसाठी गर्दी

मेहकर : लॉकडाऊन २० मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे या वेळेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यामध्ये बऱ्याचदा फिजिकल डिस्टसिंग पाळल्या जात नसल्याचे दिसून आले.

सांडपाण्याचा नाल्यांचा प्रश्न

सुलतानपूर : नालीतील सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सांडपाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. सध्या रोगराईचे वातावरण असल्याने त्यात सांडपाण्याच्या नाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

खतांचा काळाबाजार रोखण्याचे आव्हान !

बुलडाणा : ‘लॉकडाऊन’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत येत्या काळात खते व बियाण्यांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये प्रामुख्याने बोगस बियाण्यांप्रमाणेच दर्जाहीन खतांचाही पुरवठा होऊन शेतकऱ्यांची फसवणूक तथा आर्थिक पिळवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकार रोखण्याचे आव्हान कृषी विभागासमोर राहणार आहे.

अवैध रेतीसाठ्यांचे प्रमाण वाढले

किनगाव राजा : रेतीचा अवैध उपसा व वाहतूक करीत तालुक्यातील हिवरखेड पूर्णा, तढेगाव, किनगाव राजा यासह अनेक ठिकाणच्या ई-क्लास जमिनीवर माफियांनी अवैध साठेबाजीचा प्रकार अवलंबविला आहे. अवैध रेतीसाठ्यांचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: 65 positive in Buldana taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.