बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेला ६९ कोटी ९0 लाख रुपयांची मदत

By admin | Published: February 13, 2016 02:20 AM2016-02-13T02:20:30+5:302016-02-13T02:22:43+5:30

केंद्राची अंशदान योजना; बँकिंग परवान्यासाठी मदतीचा फायदा.

69.00 crore assistance to Buldhana District Co-operative Bank | बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेला ६९ कोटी ९0 लाख रुपयांची मदत

बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेला ६९ कोटी ९0 लाख रुपयांची मदत

Next

बुलडाणा : सन २0१५-१६ या चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भागभांडवल अंशदान योजनेखाली विदर्भातील नागपूर, वर्धा व बुलडाणा या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ११ फेब्रुवारी रोजी घेतला. यानुसार, बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भागभांडवल स्वरुपात ६९ कोटी ९0 लाख ७0 हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. नाबार्डच्या अहवालानुसार नागपूर, वर्धा आणि बुलडाणा या विदर्भातील तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सात टक्के भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) साध्य करण्यासाठी १४५ कोटी ९ लाख रुपयांचे अतिरिक्त अर्थसाहाय्य भागभांडवल आवश्यक होते. यापैकी ६५ कोटी ९८ लाख रुपयांचा नियतव्यय २0१५-१६ या वर्षात १९ ऑक्टोबर २0१५ रोजी उपलब्ध करण्यात आला. उर्वरित ७९ कोटी ११ लाख रुपयांचे अतिरिक्त अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय ११ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला आहे. बँकिंग परवाना प्राप्त करण्यास पात्र ठरण्याच्या दृष्टिकोनातून नागपूर, वर्धा, बुलडाणा जिल्हा बँकेला भांडवल पर्याप्तता साध्य करणे आवश्यक होते. त्यासाठी शासनाकडून मार्च २0१५ मध्ये ३७९ कोटी ६७ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे. हे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आल्यानंतर, जून २0१५ मध्ये नाबार्डने या बँकांची तपासणी केली असता, या तिन्ही जिल्हा बँकेला १४५ कोटी ९ लाख रुपयांचे जास्तीचे अर्थसाहाय्य आवश्यक असल्याचे निदर्शनास आले होते. या जिल्हा सहकारी बँकांना अर्थसहाय्य मिळाल्यामुळे जिल्ह्यातील आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे.

Web Title: 69.00 crore assistance to Buldhana District Co-operative Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.