बुलडाणा जिल्ह्यात ६९.८४ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 11:05 AM2020-06-23T11:05:23+5:302020-06-23T11:05:37+5:30

शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

69.84 per cent sowing in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात ६९.८४ टक्के पेरणी

बुलडाणा जिल्ह्यात ६९.८४ टक्के पेरणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात खरीपाची ६९.८४ टक्के पेरणी झाली आहे. पाउस नसल्याने अनेक ठिकाणी शेतकरी दुबार पेरणी करीत आहेत. १०० मीमी पाउस झालेला असेल तर बिज अंकुरण्यास १२ दिवसांचाही अवधी लागू शकतो. त्यामुळे, शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
मृग नक्षत्रात सर्वदूर पाउस झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाअभावी सोयाबीनसह अनेक पिके उगवलीच नसल्याचे चित्र आहे. आधीच लॉकडाउनमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कृषी विभागाने ८० ते १०० मिमी पाउस झाल्याशिवाय पेरणी करू नये,असा सल्ला शेतकºयांना दिला होता. मात्र, काही शेतकºयांनी अल्प पावसातही पेरणी केली. ज्या भागात ८० ते १०० मिमी पाउस झाला त्या भागातील पेरणी केलेल्या शेतकºयांनी दुबार पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. काही वेळा १२ दिवसांनी बियाणे उगवू शकते. बि जमीनीवर खोलवर गेल्याने उगवले नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे, दुबार पेरणी करण्यापूर्वी काही दिवस प्रतीक्षा करावी,असेही कृषी विभागाने म्हटले आहे.


कपाशीची ९२ टक्के पेरणी
जिल्ह्यात खरीप हंगामात ६९.८४ टक्के पेरणी आटोपली आहे. एकूण सात लाख ३४ हजार हेक्टरवर १७७ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. त्यापैकी पाच लाख १२ हजार ७७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा कपाशीचा झाला असून ९२ टक्के पेरणी झाली आहे. तसेच उसाची ९१ टक्के,सोयाबीन ६४.२९ टक्के पेरणी झाली आहे.

ज्या भागात १०० मिमी पेक्षा जास्त पाउस व मॉइश्चर असेल तर दुबार पेरणीची घाई करु नये. बियाणे खोलवर गेले असेल तर उगवण होईलच. तसेच १०० मिमी पेक्षा कमी पाउस असल्यास पेरणी करू नये.
-नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,बुलडाणा

Web Title: 69.84 per cent sowing in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.