शिक्षण विभागाची परवानगी न घेताच सुरू केला सहावीचा वर्ग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:13 AM2017-07-19T00:13:20+5:302017-07-19T00:13:20+5:30

लोणीगवळी येथील जिल्हा परिषद शाळा: गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

6th class of education department started without taking permission! | शिक्षण विभागाची परवानगी न घेताच सुरू केला सहावीचा वर्ग!

शिक्षण विभागाची परवानगी न घेताच सुरू केला सहावीचा वर्ग!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : लोणीगवळी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता सहावा वर्ग सुरू करण्यात आला असून, हा वर्ग सुरू करीत असताना मुख्याध्यापक व शिक्षक यांनी शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याची तक्रार लोणीगवळी येथील नरसिंग भास्करराव पाटील यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे.
ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा खालावल्याने पालकांचा कल खासगी शिक्षण संस्थांकडे वाढत आहे, तर तालुक्यातील लोणीगवळी येथील मुख्याध्यापक व शिक्षकांकडून पालकांची दिशाभूल करण्यात येत असून, शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी नसताना जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावा वर्ग सुरू करण्यात आला असून, नियमबाह्य सुरू केलेला हा वर्ग बंद करून पालकांची व शिक्षण विभागाची दिशाभूल करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी तक्रार लोणीगवळी येथील नरसिंग भास्करराव पाटील यांनी गटशिक्षण अधिकारी मेहकर यांच्याकडे केली आहे. लोणीगवळी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता सहावा वर्ग सुरू करण्यात आला आहे; परंतु हा वर्ग सुरू करीत असताना मुख्याध्यापक व शिक्षक यांनी शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे, तसेच जिल्हा परिषद शाळेच्या एक किलोमीटरच्या आत निमशासकीय अनुदान प्राप्त शाळा असून, त्या ठिकाणी वर्ग ५ ते १२ वीपर्यंत वर्ग असून, शिक्षणसुद्धा व्यवस्थित सुरू आहे. तरीसुद्धा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी शासनाची व पालकांची दिशाभूल करून सहावा वर्ग सुरू केला आहे. ही एकप्रकारे विद्यार्थी व पालकांची फसवणूक आहे. त्यामुळे शासनाची व पालकांची दिशाभूल करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी व नियमबाह्य सुरू केलेला सहावा वर्ग बंद करावा, अशी मागणीही नरसिंग भास्करराव पाटील यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे.

लोणीगवळी येथील जिल्हा परिषद शाळेला सहावा वर्ग काढण्याचे कोणतेही आदेश नाही. त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून, त्याबाबतची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच पाचवा वर्ग पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसा दाखला नेलेला नाही, असे संबंधित शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यावर चौकशी करून कारवाई करू.
- किशोर पागोरे, गटशिक्षणाधिकारी,मेहकर.

Web Title: 6th class of education department started without taking permission!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.