७० लाखांच्या कामावर सात कोटींची उधळपट्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 03:49 PM2019-09-06T15:49:59+5:302019-09-06T15:50:07+5:30

७० लाखांच्या रस्त्यांवर सात कोटींचा खर्च करून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे

 7 crores spent over work of 70 lakhs in Khamgaon | ७० लाखांच्या कामावर सात कोटींची उधळपट्टी!

७० लाखांच्या कामावर सात कोटींची उधळपट्टी!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:  नगर पालिकेच्या हद्दीतील भारत कटपीस ते फरशी रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि रूंदीकरणाचे काम गत दीड वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत सामान्य नागरिकांसह व्यापारीही वेठीस धरल्या जाते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात संताप व्यक्त होत आहे. त्याचवेळी ७० लाखांच्या रस्त्यांवर सात कोटींचा खर्च करून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.
 खामगाव नगर पालिका हद्दीतील भारत कटपीस ते फरशी रस्ता क्राँकीटीकरण आणि रूंदीकरणाचे काम जानेवारी २०१८ मध्ये सुरू झाले. मात्र, सुरूवातीपासूनच ढिसाळ नियोजन आणि कासवगतीमुळे रस्त्याचे काम चांगलेच रखडले. दरम्यान, भूमिगत केबल, पाणी पुरवठ्याची पाईपलाईन, बीएसएनएल कंपन्यांचे भूमिगत केबल यामुळे कामास विलंब झाला. त्यानंतर सुमारे २ महिने न्यायालयीन वादामुळे रस्त्याच्या कामास विलंब झाला. मात्र, त्यानंतर तब्बल २० महिने पूर्णत्वास गेल्यानंतरही रस्ता कामाने गती घेतलेली नाही. या रस्ताकामातंर्गत आॅक्टोबर २०१८ मध्ये पाणी पुरवठा पाईपलाईन वळविण्यासाठी कायार्देश देण्यात आला. मात्र, सुरूवातीपासूनच नियोजन शून्य कारभारामुळे या रस्ता कामास विलंब होत आहे. दर दोन-तीन  महिन्याच्या कालावधीनंतर कंत्राटदार काम सुरू करते. चार-पाच दिवस काम चालते. त्यानंतर पुन्हा काम खोळंबते. अनेक दिवस काम होत नसल्याने, खड्डे आणि मातीचे ढिगार तसेच पडून राहतात. सात कोटीच्या कामावर एकच क्राँकीट मिक्सर आणि चार पाच मजूर दिसतात. त्यामुळेही या कामास विलंब होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांचा आहे. भारत कटपीस ते महावीर चौक पर्यंत विद्युत केबल, पाईपलाईन आणि इतर कामे झाली आहेत. मात्र, कंत्राटदाराच्या अकार्यक्षमतेमुळेच काम रखडत असल्याचा आरोप होत आहे.

भारत कटपीस ते फरशी रस्त्याचे काम अवघ्या ७० लाखांमध्ये पूर्णत्वास जावू शकते. मात्र, सत्ताधाºयांनी टोलसाठी रस्ता बांधकामाची रक्कम ७ कोटींवर नेली. या रस्त्याचा कंत्राट नाशिक येथील एका कंपनीला केवळ नावापुरता देण्यात आला. प्रत्यक्षात काम मात्र, सत्ताधारी नगरसेवक पुत्रच करीत आहे. सणासुदीच्या दिवसांतील त्रास टाळण्यासाठी जनेतेने आवाज, उठवावा, काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत राहील.
- अर्चना टाले, गटनेत्या काँग्रेस, नगर परिषद, खामगाव.

Web Title:  7 crores spent over work of 70 lakhs in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.