बुलडाणा जिल्ह्यात ७० नवे कोरोना पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या १६८७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 11:18 AM2020-08-07T11:18:24+5:302020-08-07T11:18:38+5:30
७० कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण रुग्ण संख्या १,६८७ वर पोहोचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात गुरूवारी पुन्हा ७० कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण रुग्ण संख्या १,६८७ वर पोहोचली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट केलेल्या ४७२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४०२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे खामगावातील शिवाजीनगरमधील एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा येथे बजरंगनरमध्ये एक, काँग्रेसनगर मध्ये एक, जिल्हा न्यायालयातील दोन, जुन्यागावातील दोन, सुंदरखेडमधील एक, तानाजी नगरमधील एक आणखी एक असे एकूण नऊ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. बुलडाणा तालुक्यातील केसापूर येथे एक, साखळी येथे एक, दत्तपूर येथे एक, मलकापूरमध्ये दोन, नांदुऱ्यात सात, वसाडी बुद्रूक येथे तीन, चांदुरबिस्वा येथे दोन, चिखली येथे एक, शेगावमध्ये चार, लोणारात पाच, गोतमारा येथे दहा, देऊळगाव राजातील अंभोरा येथे एक, असोला येथे दोन, देऊळगाव राजात पाच, डिग्रस येथे १३, खामगाव शहरातील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, खामगावमधील शिवाजीनगर भागातील ६२ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बुधवारी ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मलकापूर एक, सुलतानपूर एक, नांदुºयातील पाच, खामगावमधील चार जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ११ हजार ९३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्याच प्रमाणे ९९० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.