लाेणार तालुक्यात ७० टक्के पेरणी आटाेपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:23 AM2021-06-22T04:23:41+5:302021-06-22T04:23:41+5:30

लोणार : तालुक्यातील अनेक गावांमध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जाेरदार पावसामुळे ७० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी आटाेपली आहे़ गत काही ...

70% sowing has been completed in Laenar taluka | लाेणार तालुक्यात ७० टक्के पेरणी आटाेपली

लाेणार तालुक्यात ७० टक्के पेरणी आटाेपली

Next

लोणार : तालुक्यातील अनेक गावांमध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जाेरदार पावसामुळे ७० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी आटाेपली आहे़ गत काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़ आणखी आठ दिवस पिके तग धरू शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखीच गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोणार तालुक्यातील कृषी हंगाम हा शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त असते. लोणार तालुक्यात सुमारे ३६ हजार शेतकरी असून या सर्व शेतकरी कुटुंबीयांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याची भाकिते वेधशाळेने वर्तविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. पेरणीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावरच जोरदार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला आहे, असे गृहीत धरून अनेक शेतकऱ्यांनी या पहिल्याच पावसावर पेरणी करण्याचा निर्णय घेतला.

जून महिन्यात झालेल्या पहिल्या दमदार पावसानंतर अधून-मधून पावसाचा शिडकावा झाला. परंतु, पिकांना पोषक पाऊस झाला नाही. पंधरा दिवसांपासून तर हा पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे पिके धोक्यात सापडली आहेत. यावर्षी तालुक्यात शेतकऱ्यांनी सोयाबीनला लागवडीला प्राधान्य दिले आहे. सोयाबीनपाठोपाठ कापूस, तूर आणि मुगाची पेरणीही झाली आहे. परंतु, पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढू लागल्या आहेत. मागील १५ दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. सध्या पिके अंकुरलेल्या अवस्थेत असून, पिकांच्या वाढीसाठी मुबलक पावसाची गरज आहे. परंतु, पाऊसच पडत नसल्याने ही पिके वाढण्याऐवजी रोगाचा बळी ठरत आहेत. पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या ही पिके तग धरून आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देऊन जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत दमदार पावसाचे पुनरागमन झाले नाही तर दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यावर ओढवू शकते.

४० हजार हेक्टवर साेयाबीनची पेरणी

तालुक्यात गत वर्षी ४० हजार ९३ हेक्टरवर साेयाबीनची पेरणी झाली हाेती़ यावर्षी ४० हजार १०२ हेक्टरवर साेयाबीनची पेरणी हाेणार असल्याचा अंदाज कृषी विभागने व्यक्त केला आहे़ त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी आटाेपली आहे़ तसेच कापूस २ हजार ६८० हेक्टर, तूर ७ हजार ४१२ हेक्टर, मूग एक हजार ४३३ हेक्टर आणि उडीद १ हजार ४७० हेक्टरवर पेरणी हाेणार आहे़ पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचे डाेळे आभाळाकडे लागले आहेत़

Web Title: 70% sowing has been completed in Laenar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.