सात दिवसांत वाढले ७0 हजार शेतकरी !

By Admin | Published: August 13, 2015 12:29 AM2015-08-13T00:29:06+5:302015-08-13T00:29:06+5:30

पीक विमा मुदतवाढीचा लाभ; १४ कोटींची विमा रक्कम जमा.

70 thousand farmers increased in seven days! | सात दिवसांत वाढले ७0 हजार शेतकरी !

सात दिवसांत वाढले ७0 हजार शेतकरी !

googlenewsNext

बुलडाणा : नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शासनाने राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना लागू केली आहे. २0१५-१६ या खरीप हंगामासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांतील २ लाख ८८ हजार ३५८ हेक्टरवरील पिकांना विम्याचे संरक्षक कवच मिळाले आहे. दरम्यान, शासनाने पीक विमा काढण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार ३१ जुलै ते ७ ऑगस्ट या सात दिवसांत तब्बल ७0 हजार शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले आहेत. दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. कधी अतवृष्टी, तर कधी अवर्षण अशा परिस्थितीमुळे नापिकी होते. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो व त्याला नैराश्य येते, शिवाय शेतकरी आत्महत्याच्या घटनासुद्धा घडत आहेत. नैसर्गिक आपत्तीनंतर शासनाकडून मदत मिळत असली तरी ती पिकाच्या नुकसानाची भरपाई करेल एवढी नसते. त्यामुळे शेतकर्‍यांनी पीक विमा काढला, तर नुकसानाच्या तुलनेत समाधानकारक मदत मिळण्याची आशा असते. त्यामुळे या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये घेण्यात येणार्‍या ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तीळ, बाजरी, नाचणी, भुईमूग, कांदा, मका या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळा हप्ता ठरविण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानाच्या स्थितीत काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य देण्यासाठी राबविण्यात येणार्‍या या योजनेत ३0 जुलैपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ४८ हजार २३ शेतकर्‍यांनी सहभाग नोंदविला. २0१५-१६ च्या खरीप हंगामातील सर्व पिकांसाठी पेरणीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच ४ जूनपासून तर शेवटचा टप्पा म्हणजे ३१ जुलैपर्यत पीक विमा काढण्याचे आवाहन शेतकर्‍यांना करण्यात आले होते. त्याला सर्व १३ तालुक्यांतील सुमारे अडीच लाख शेतकर्‍यांनी प्रतिसाद दिला. याशिवाय ७ ऑगस्टपर्यत योजनेला मुदतवाढ देण्यात आल्यामुळे पुढे सात दिवसांत तब्बल ७0 हजार शेतकर्‍यांनी याचा लाभ घेतला.

Web Title: 70 thousand farmers increased in seven days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.