७११ जणांची काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:32 AM2021-05-22T04:32:24+5:302021-05-22T04:32:24+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेनाचा आलेख कमी हाेत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील ७११ जणांनी ...
बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेनाचा आलेख कमी हाेत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील ७११ जणांनी काेराेनावर मात केली आहे. तसेच पाच जणांचा मृत्यू झाला असून, ६५५ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील ४ हजार ३८३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
उपचारादरम्यान भालेगाव बाजार, ता. खामगाव येथील ७८ वर्षीय महिला, येळगाव, ता. बुलडाणा येथील ६७ वर्षीय पुरुष रोहणा, ता. खामगाव येथील ५५ वर्षीय महिला, चिंचखेड, ता. मुक्ताईनगर येथील ५५ वर्षीय महिला, जळगाव जामोद येथील ३२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर २०, बुलडाणा तालुका : १२, मोताळा शहर ०४, मोताळा तालुका लपाली ४१, कोथळी २८, तळणी १०, शेलापूर ५, खामगाव शहर : ३७, खामगाव तालुका १८, शेगाव शहर ०६, शेगाव तालुका ०८, चिखली शहर २१, चिखली तालुका ५५, मलकापूर शहर २०, मलकापूर तालुका १७, दे. राजा शहर २७ , दे. राजा तालुका उंबरखेड १४, सिनगाव जहा २६ सिं. राजा शहर ५, सिं. राजा तालुका २४, मेहकर शहर १२, मेहकर तालुका ३२, संग्रामपूर तालुका १२, जळगाव जामोद शहर १६, जळगाव जामोद तालुका वडशिंगी १६ नांदुरा शहर २१, नांदुरा तालुका ०८, लोणार शहर ०४ , लोणार तालुका : १२ इतर जिल्ह्यांतील आठ जणांचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत ४ लाख ४० हजार ५५८ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ७५ हजार ३७९ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.
आतापर्यंत ५४१ जणांचा मृत्यू
आज रोजी ३ हजार ५७३ नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८१ हजार १९० कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ७५ हजार ३७९ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ५ हजार २७० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ५४१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.