बुलडाणा जिल्ह्यात ७२ नवे पॉझिटिव्ह; ४५० जणांचे अहवाल निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 07:17 PM2020-08-08T19:17:59+5:302020-08-08T19:18:06+5:30
जिल्ह्यात शनिवारी ७२ जण कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण बाधितांची संख्या आता १,८४० झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात शनिवारी ७२ जण कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण बाधितांची संख्या आता १,८४० झाली आहे. दरम्यान, ४५० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. प्रयोगशाळेतून आणि रॅपीड टेस्ट केलेल्यांपैकी एकूण ५२२ जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यापैकी ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २२७ नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. एकाच दिवशी १०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये देऊळगाव राजात तीन, सावखेड भोई येथील सहा, देऊळगाव मही येथील एक, चांदुरबिस्वा येथील दोन, नांदुरा येथील ११, लोणारमधील सात, लोणार तालुक्यातील दहीफळ येथील एक, भानापूर येथील दोन, सुलतानपूर येथील सहा, खळेगाव येथील एक, शेंदुर्जन येथील एक, येसापूर येथील एक, चिखलीत चार, मलकापूरातील एक, खामगावमधील १७, बुलडाण्यातील पाळणा घराजवळ दोन, जानेफळमधील एक, डोणगावातील एक, गोतमारा येथील चार जणांचा समावेश आहे. दुसरीकडे आतापर्यंत जिल्ह्यातील ११ हजार ९८८ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे एक मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे १,१२५ कोरोनाबाधीत रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी २२७ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या १, ८४० झाली असून यापैकी ६१ टक्के रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दुसरीकडे एकुण रुग्णांपैकी सध्या ३७ टक्के बाधीत रुग्ण असून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.
जिल्ह्यात ३५ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच २२७ नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार ९८८ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १८४० वर पोहचली आहे. त्यापैकी ११२५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या ६८० कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खामगावमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातही रुग्णसंख्येत वाढ झाली.