पहिल्या आठवड्यात ७,४१९ विद्यार्थी हजर; सर्वजण ठणठणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 12:07 PM2020-12-06T12:07:19+5:302020-12-06T12:09:24+5:30
Buldhana News ५३९ शाळा सुरू या शाळांमध्ये पहिल्या आठवड्यात ७,४१९ विद्यार्थी पहिल्या आठवड्यात उस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटला असून, या कालावधीत ६६५ पैकी ५३९ शाळांमध्ये ७,४१९ विद्यार्थी हजर होते. आठवड्यानंतर या सर्व मुलांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती आरोग्य व शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.
कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा मार्च महिन्यापासून बंद होत्या. २३ नोव्हेंबरपासून नववी व बारावीचे वर्ग जिल्ह्यात सुरू झाले. यामध्ये प्रत्यक्षात ५३९ शाळा सुरू या शाळांमध्ये पहिल्या आठवड्यात ७,४१९ विद्यार्थी पहिल्या आठवड्यात उस्थित होते. प्रत्यक्षात मात्र २० हजार पालकांनी संमतीप६ दिले होते. दरम्यान ६१८५ पैकी ५,९०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळांवर हजर होते. अद्यापही ८३९ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत ७३ शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यामुळे नऊ शाळा अद्यापही बंद असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. अद्यापही कोरोनाची धास्ती कायम असल्याने शाळेत विद्यार्थ्यांची संख्या तशी कमीच आहे. टप्प्या टप्प्याने सध्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील शाळा सुरळीत सुरू आहेत. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी प्रारंभापासूनच सुयोग्य नियोजन व उपाययोजना केल्या आहेत.
- किशोर पागोरे,
उप शिक्षणाधिकारी