स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ किमी सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:39 AM2021-08-14T04:39:56+5:302021-08-14T04:39:56+5:30
स्वातंत्र्य दिनी पहाटे ५ वाजता बुलडाण्यातील हुतात्मा सिद्धेश्वर गोरे स्मारकापासून सायकलिंगला सुरुवात होणार आहे. या ७५ कि.मी.च्या सायकल ...
स्वातंत्र्य दिनी पहाटे ५ वाजता बुलडाण्यातील हुतात्मा सिद्धेश्वर गोरे स्मारकापासून सायकलिंगला सुरुवात होणार आहे. या ७५ कि.मी.च्या सायकल रॅलीला अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे हिरवी झेंडी दाखवणार आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी व पर्यावरण रक्षणासाठी सायकल चालविणे फायदेशीर असते. या उपक्रमात सायकलींची आवड असणारे युवक, युवती, महिला, पुरुष सहभागी होऊ शकतात. हुतात्मा स्मारकापासून सुरु होणारी सायकल रॅली सर्क्युलर रोड, चिखली रोड, केळवद, चिखली, मेहकर फाटा ते मेरा फाटा व परत हुतात्मा स्मारक असा रॅलीचा मार्ग राहील. या सायकलिंगच्या कार्यक्रमात बुलडाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय सायकलपटू संजय मयुरे यांच्यासह संदीप मुंढे, निखिल राजपुत, नितीन देशमुख, राहुल मोरे, संदीप राजपूत, विजय कानडजे, प्रतीक देशमुख, गणेश देवरे, शरद राखोंडे, अलका गिरी यांनी केले आहे.