पीएम केअर फंडातून जिल्ह्याला ७५ व्हेंटिलेटर्स, ९ बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:35 AM2021-05-12T04:35:40+5:302021-05-12T04:35:40+5:30
--कोठे किती व्हेंटिलेटर्स सुरू-- रुग्णालय ...
--कोठे किती व्हेंटिलेटर्स सुरू--
रुग्णालय एकूण सुरू
१) कोविड समर्पित रुग्णालय ३९ ३३
२) खामगाव सामान्य रुग्णालय १५ १५
३) शेगाव उपजिल्हा रुग्णालय १७ १४
४) उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर ०४ ०४
एकूण:- ७५ ६६
--पूरक सुविधा देण्याची गरज--
व्हेंटिलेटर्सयुक्त बेडसाठी डॉक्टर्स, परिचारिका व इतर सुविधा देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने काही ठिकाणी मर्यादित स्वरूपात या सुविधा उपलब्ध असल्याने ९ व्हेंटिलेटर्स कार्यान्वित होण्यात अडचणी येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वास्तविक बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढले असून शासकीय रुग्णालयातील ९२३ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. त्यातच ऑक्सिजन लावूनही रुग्ण प्रतिसाद देत नसल्यास त्यास व्हेंटीलेटर बेडवर ठेवावे लागले. त्यामुळे हे बेड वाढविणे गरजेचे आहे.