राष्ट्रीय ग्रामीण पेयजलची ७७ कामे प्रगतीपथावर!

By admin | Published: October 3, 2016 02:51 AM2016-10-03T02:51:54+5:302016-10-03T02:51:54+5:30

बुलडाणा जिल्ह्यासाठी ८६ कामांचे उद्दिष्ट दिले असून येत्या उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करणे शक्य असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.

77 works of National Rural Drinking Water in progress! | राष्ट्रीय ग्रामीण पेयजलची ७७ कामे प्रगतीपथावर!

राष्ट्रीय ग्रामीण पेयजलची ७७ कामे प्रगतीपथावर!

Next

ब्रह्मनंद जाधव
बुलडाणा, दि. 0२- जिल्ह्यात गेल्या तीन वर्षातील वाढती पाणी टंचाई लक्षात घेता पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठय़ाच्या विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. सन २0१६-१७ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमासाठी ८६ पाणी पुरवठय़ांच्या कामांचे उद्दिष्ट देण्यात आले असून जिल्हाभरात उद्दिष्टापैकी ७७ कामे प्रगतिपथावर सुरू आहेत.
गेल्या तीन वर्षात पाणीटंचाईचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावात अस्तित्वात असलेल्या सर्व पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन त्यातील स्रोतांचे संवर्धन व बळकटीकरण करणे, तसेच पाणी पुरवठय़ाच्या विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत शासनाच्या धोरणानुसार मागणी आधारित लोकसहभागातून पाणीपुरवठय़ाचे सुधारित धोरण जाहीर केले असून ग्रामस्तरावर ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती स्थापन केली आहे. त्यानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेची कामे मागणी आधारित समूह सहभागावर नियोजन, अंमलबजावणी आणि देखभाल व दुरुस्ती ग्रामस्थांच्या हातात सोपविण्यात आलेली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रस्तावित उपाययोजनांच्या सूक्ष्म नियोजनाअंती दरवर्षी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येते. त्याचप्रमाणे सन २0१६-१७ चा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम कृती आराखडा तयार करण्यात आलेला असून, कृती आराखड्यानुसार तालुकानिहाय पाणीपुरवठय़ाच्या ८६ कामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यासाठी पाणीपुरवठय़ाची ८ कामे, चिखली ८, देऊळगावराजा ५, खामगाव ६, लोणार ४, मलकापूर ५, मेहकर १४, मोताळा १0, नांदुरा ११, सिंदखेडराजा १४, शेगाव एक अशा एकूण ८६ कामांचे उद्दिष्ट आहे.
उद्दिष्टांपैकी जिल्ह्यात पाणीपुरवठय़ाची ७७ कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर या दोन तालुक्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले नाही. यामध्ये १00 टक्के घरगुती नळ जोडणे व मागील तीन वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा केलेल्या गावांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे येणार्‍या उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही गावे टंचाईमुक्त होणार आहेत.

उद्दिष्टाव्यतिरिक्त २0 कामांचा समावेश
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम कृती आराखड्यामध्ये ८६ कामांचे उद्दिष्ट आहे. तसेच उद्दिष्टाव्यतिरिक्त राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम कृती आराखड्यात २0 कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात २, चिखली ३, जळगाव जामोद १, खामगाव २, मलकापूर १, मेहकर २, नांदुरा ७, सिंदखेडराजा १, संग्रामपूर १ अशापक्रारे उद्दिष्टांव्यतिरिक्त कामांचा समावेश करण्यात आलेला आहे; परंतु उद्दिष्टाव्यतिरिक्तचे एकही काम सध्या हाती घेण्यात आलेले नाही.

Web Title: 77 works of National Rural Drinking Water in progress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.