पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांना आरटीईचा ‘ग्रीन सिग्नल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:26 PM2019-07-13T13:26:32+5:302019-07-13T13:26:43+5:30
बुलडाणा: आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत तिसरी लॉटरी १० जुलै रोजी काढण्यात आली असून, या लॉटरीमध्ये पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांची निवड केल्याने त्यांना मोफत प्रवेशासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत तिसरी लॉटरी १० जुलै रोजी काढण्यात आली असून, या लॉटरीमध्ये पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांची निवड केल्याने त्यांना मोफत प्रवेशासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. तिसऱ्या लॉटरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरीता १८ जुलैची अंतीम मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत १ हजार ८५० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.
जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २०१९-२०२० या शैक्षणिक सत्रामध्ये २ हजार ९२९ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येत आहे. मोफत प्रवेशासाठी ५ हजार ३२८ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज आले आहेत. त्यापैकी पाहिल्या दोन लॉटरीमध्ये २ हजार ७०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ हजार ८५० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. दरम्यान, १० जुलै रोजी राज्यस्तरीय तिसरी लॉटरी काढण्यात आली. तिसºया लॉटरीमध्ये ७७२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. आरटीईच्या मोफत प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या ५ हजार ३२८ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ४८० विद्यार्थ्यांची एकूण तीन लॉटरींमधून निवड करण्यात आली आहे.
सध्या तिसºया लॉटरीत निवड झालेल्या ७७२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू आहे. शाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी गेला असल्याने प्रवेशाकरीता पालकांची तारांबळ उडत आहे. २५ टक्के मोफत प्रवेशासाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना नंबर लागल्याने आता ही संधी हुकायला नको, यासाठी पालकांची प्रवेशासाठी धावपळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
पालकांना एसएमस जाण्यास सुरूवात
१० जुलै २०१९ रोजी राज्यस्तरीय तिसरी लॉटरी काढण्यात आली आहे. राज्यातील लॉटरी लागलेल्या पालकांना ११ जुलै २०१९ पासून एसएमएस जाण्यास सुरवात झाली आहे. एसएमएस न आल्यास वेबसाईट वर जाऊन ‘अॅप्लीकेशन वाईज डिटेल्स’मध्ये अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे का ते पाहावे लागणार आहे. फक्त एसएमएसवर अवलंबून राहू, नये असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी सहा दिवस
४तिसºया लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ११ जुलै पासून १८ जुलै पर्यंत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिलया आहेत. त्यानुसार प्रवेशासाठी पालकांना सात दिवसाचा कालावधी देण्यात आला असून, आता अवघे सहा दिवस पालकांच्या हातात उरले आहेत. सध्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक सत्रातील अभ्यासक्रमास सुरूवात झालेली असल्याने प्रवेशासाठी पालकांच्या धवपळ सुरू आहे.