७८ विद्यार्थ्यांना ‘कॅलीपर फिटमेंट’ मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2016 02:25 AM2016-03-22T02:25:25+5:302016-03-22T02:25:25+5:30

सर्व शिक्षा अभियानातंर्गत अस्थिव्यंग अपंग मुलांचा समावेश.

78 students will get 'caliper fitment' | ७८ विद्यार्थ्यांना ‘कॅलीपर फिटमेंट’ मिळणार

७८ विद्यार्थ्यांना ‘कॅलीपर फिटमेंट’ मिळणार

Next

नाना हिवराळे / खामगाव
खामगाव : सर्व शिक्षा अभियान अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत अस्थिव्यंग अपंग मुलांना कॅलीपर साहित्याची निश्‍चिती झाली असून, जिल्ह्यातील ७८ विद्यार्थी लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना २२ व २३ मार्च रोजी कॅलीपर फिटमेंट करून मिळणार आहे.
शाळेतील तसेच शाळाबाह्य 0 ते १८ वयोगटातील सर्वच गतिमंद, बहूविकलांग, सेरेब्रल पाल्सी, अस्थिव्यंग व कर्णबधिर विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत देण्यात येते. शाळातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी, तसेच एकही मूल शाळाबाह्य राहू नये, याकरिता शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. अपंग विद्यार्थ्यांची तपासणी झाल्यावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर तपासणी होऊन पात्र लाभार्थी ठरविले जातात.
१0 ते १२ सप्टेंबर २0१५ या कालावधीत अलिम्को तज्ज्ञ पथकामार्फत अस्थिव्यंग अपंग मुलांचे साहित्य साधनाकरिता जिल्हा स्तरावर मोजमाप करण्यात आले होते. यामध्ये ७८ अस्थिव्यंग अपंग मुले पात्र ठरली होती. पात्र लाभार्थींना अलिम्को तज्ज्ञ पथकामार्फत २२ व २३ मार्च रोजी जिल्हास्तरावर ह्यकॅलीपर फिटमेंटह्ण करून देणार आहेत.
बुलडाणा येथील नगर परिषद मराठी शाळा क्र.२ येथे सदरहू शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांंना लाभ होईल.

खामगाव तालुक्याला मिळाले साहित्य
जिल्हा पुरूष अधिकारी तथा शिक्षण (प्राथ.) जि.प. कडून अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत खामगाव तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना ४२ साहित्य प्राप्त झाले आहेत. यामध्ये तीन चाकी सायकल (मोठी),१ नग, व्हिलचेअर १३, सी.पी. चेअर ४, एमआर किट ८, एल्बो कुबडी २, कुबडी-२, रोलेटर ९, ब्रेलकिट २ व स्मार्ट केन १ नग अशा साहित्यांचा समावेश आहे.

Web Title: 78 students will get 'caliper fitment'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.