शेततळ्यांसाठी ८ कोटी ५४ लाख रूपयांचा निधी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 07:49 PM2017-09-06T19:49:55+5:302017-09-06T19:50:15+5:30

दुष्काळावर मात करण्यासह शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्यात येत आहे.

8 crore 54 lakh rupees for the farmers | शेततळ्यांसाठी ८ कोटी ५४ लाख रूपयांचा निधी वाटप

शेततळ्यांसाठी ८ कोटी ५४ लाख रूपयांचा निधी वाटप

Next
ठळक मुद्देमागेल त्याला शेततळे ही योजना सिंचन वाढविण्यासाठी उपक्रम जिल्ह्यात शेततळे निर्माण करण्यासाठी ८ कोटी ५४ लाख १४ हजार रूपये अनुदान वाटप 

हर्षनंदन वाघ
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दुष्काळावर मात करण्यासह शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गंत जिल्ह्यात शेततळे निर्माण करण्यासाठी ८ कोटी ५४ लाख लाख १४ हजार रूपये अनुदान निधी वाटप करण्यात आले असून सर्वात जास्त निधी खामगाव उपविभागात ३ कोटी ५८ लाख ४५ हजार रूपये निधी वाटप करण्यात आला आहे. या योजनेमुळे कोरडवाहू शेतकºयांची सिंचन क्षमता वाढली आहे. 
जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गंत एकूण ५ हजार शेततळ्यांचे लक्षांक ठेवण्यात आले होते. यासाठी आलेल्या ८ हजार ३५८ अर्जातून ३ हजार ९८२ अर्जदार शेतकºयांना शेततळे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ९४४ शेतकºयांना शेततळ्याची आखणी करून देण्यात आली. मात्र  त्यौपैकी २ हजार ९९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. अशा कामे पूर्ण झालेल्या शेतकºयांना शेततळ्याची अनुदान रक्कम ८ कोटी ५४ लाख १४ हजार रूपये वाटप करण्यात आले आहेत. त्यात बुलडाणा तालुक्यात ४७ लाख ४८ हजार रूपये, चिखली तालुक्यात ६३ लाख ७० हजार, मोताळा तालुक्यात ७४ लाख ९४ हजार, मलकापूर तालुक्यात ५९ लाख ८ हजार, खामगाव तालुक्यात ९७ लाख ७६ हजार, शेगाव तालुक्यात ७२ लाख २५ हजार, नांदूरा तालुक्यात ५७ लाख ७१ हजार, संग्रामपूर तालुक्यात ७४ हजार ४६ हजार, जळगाव जामोद तालुक्यात ५६ हजार २७ हजार, मेहकर तालुक्यात ५२ लाख २२ हजार, लोणार तालुक्यात ५७ लाख २२ हजार, देऊळगाव राजा तालुक्यात ८२ हजार ४१ हजार व सिंंदखेड राजा तालुक्यात ५६ लाख १७ हजार रूपये अनुदान वाटप करण्यात आले.

खामगाव उपविभागात ३ कोटी ५८ लाख अनुदान वाटप
मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेअंतर्गंत सर्वात जास्त अनुदान खामगाव उपविभागात ३ कोटी ५८ लाख ४५ हजार रूपये निधी वाटप करण्यात आले. त्यानंतर मेहकर उपविभागात  २ कोटी ४८ लाख २ हजार रूपये तर बुलडाणा उपविभागात सर्वात कमी २ कोटी ४५ लाख २९ हजार रूपये अनुदान वाटप करण्यात आले.

Web Title: 8 crore 54 lakh rupees for the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.