बुलडाणा जिल्ह्यात दररोज धावतात ८० ‘विना वाहक - विना थांबा’ बसफेºया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 05:14 PM2019-07-31T17:14:01+5:302019-07-31T17:14:20+5:30

बुलडाणा: जिल्ह्यातून दररोज ८० विना वाहक-विना थांबा बसफेºया सुरू करण्यात आल्या आहेत.

80 'no conductor - no stop' bus Run daily in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात दररोज धावतात ८० ‘विना वाहक - विना थांबा’ बसफेºया

बुलडाणा जिल्ह्यात दररोज धावतात ८० ‘विना वाहक - विना थांबा’ बसफेºया

Next

योगेश देऊळकार

बुलडाणा: जिल्ह्यातून दररोज ८० विना वाहक-विना थांबा बसफेºया सुरू करण्यात आल्या आहेत. खामगाव-अकोला व शेगाव-अकोला मार्गावर सध्या २० बस धावत आहेत. या माध्यमातून दररोज प्रवास करणाºयांचा प्रवास सुकर झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.  
आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक काम झटपट करण्याकडे सर्वांचाच कल असतो. विविध खासगी व शासकीय कामांसह नोकरीनिमित्त नागरिकांना प्रवास करावा लागतो. जिल्ह्यात खामगाव व शेगाव येथून अकोला येथे दररोज ये-जा करणाºयांचे प्रमाण अधिक आहे. या सर्व प्रवाशांना कमीत कमी वेळेत नियोजित ठिकाणी पोहचता यावे यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून विना वाहक-विना थांबा बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  खामगाव ते अकोला मार्गावर दिवसाला ४० तर शेगाव ते अकोला मार्गावरदेखील ४० बसफेºयांची व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन्ही मार्गावर प्रत्येकी १० बस धावतात. खामगाव ते अकोला मार्गावर पाच खामगाव व पाच अकोला तर शेगाव-अकोला या मार्गावर पाच शेगाव व पाच अकोला आगाराच्या बसची स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुविधेबरोबरच एसटी महामंडळाला देखील यामुळे फायदा होत आहे. पाच वाहकांचे काम आता दोन वाहक करीत असल्याने वाहकांच्या पगारावर होणारा खर्च कमी होण्यास मदत झाली आहे. एसटीचा प्रवास सुखी प्रवास हे ब्रिद वाक्य प्रत्यक्षात अंंमलात आणण्याचे कामदेखील सदर सुविधेमुळे होत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 

 प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने विना वाहक-विना थांबा ही महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेऊन एसटी बसने सुरक्षित प्रवास करावा.
 -ए. यु. कच्छवे, जिल्हा वाहतुक अधिकारी

 

Web Title: 80 'no conductor - no stop' bus Run daily in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.