ज्ञानगंगा अभयारण्यात ८० ट्रॅप कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 03:39 PM2019-12-07T15:39:33+5:302019-12-07T15:39:39+5:30

वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी ज्ञानगंगा अभयारण्यात तब्बल ८० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.

80 trap cameras in Dnyan Ganga Sanctuary | ज्ञानगंगा अभयारण्यात ८० ट्रॅप कॅमेरे

ज्ञानगंगा अभयारण्यात ८० ट्रॅप कॅमेरे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: टी-१ सी-१ वाघाच्याज्ञानगंगा अभयारण्यातील गेल्या चार ते पाच दिवसाचे वास्तव्य पाहता त्याचे छायाचित्र व जंगलामधील त्याच्या हालचाली टिपण्यासाठी ज्ञानगंगा अभयारण्यात तब्बल ८० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. दरम्यान, या वाघासंदर्भात येत्या काळात होणाऱ्या टायगर सेलच्या बैठकीत तो स्थिरावण्यासाठी येथे नेमक्या काय उपाययोजना कराव्या लागणार याचा उहापोह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडेही वन्यजीव प्रेमींचे लक्ष लागून आहे.
ऐरवी वर्षातून दोनदा होणाºया टायगर सेलच्या बैठकीला यावेळी सी-१ वाघामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. टी-१ सी-१ वाघाच्या ज्ञानगंगामधील वावरामुळे अप्पर प्रधान वनसंरक्षक तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यानीही ज्ञानगंगा अभयारण्यास भेट देऊन येथील उपाययोजना व परिस्थितीची पाहणी केली. या व्यतिरिक्त अकोला वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक मनोजकुमार खैरनार यांच्यासह अन्य यंत्रणा येथे सध्या कामाला लागली आहे. या व्यतिरिक्त स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सची गस्तही अभयारण्यात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ऐरवी वरकरणी शांत वाटणाºया ज्ञानगंगा अभयारण्यास अधिकाऱ्यांच्या भेटी वाढल्या आहेत.
बुलडाणा, चिखली, खामगाव आणि मोताळा या चार तालुक्यात २०५.११ चौरस किमी क्षेत्रावर ज्ञानगंगा अभयारण्य पसरलेले आहे. जैवविविधतेची भरमार असलेल्या या अभयारण्यात तेलीणीची गुहाही प्रसिद्ध आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्या अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात होणाºया टायगर सेलच्या बैठकीस जिल्हाधिकारी, जिल्हा उपवनसंरक्षक (प्रादेशिक), वन्यजीव विभागाचे अधिकारी, वन्यजीव तज्ज्ञ यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित असतात. या बैठकीत टी-१ सी-१ वाघाच्या संदर्भाने आणखी काय माहिती मिळते याकडे सध्या वन्यप्रेमींचे लक्ष लागून आहे.

Web Title: 80 trap cameras in Dnyan Ganga Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.