शेगाव तालुक्याचा ८०.२४ टक्के निकाल

By admin | Published: June 14, 2017 01:50 AM2017-06-14T01:50:08+5:302017-06-14T01:50:08+5:30

शेगाव : शेगाव तालुक्याचा दहावीचा निकाल एकूण ८०.२४ टक्के लागला आहे. यात तालुक्यातील ३ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे.

80.24 percent result in Shegaon taluka | शेगाव तालुक्याचा ८०.२४ टक्के निकाल

शेगाव तालुक्याचा ८०.२४ टक्के निकाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शेगाव तालुक्याचा दहावीचा निकाल एकूण ८०.२४ टक्के लागला आहे. यात तालुक्यातील ३ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. यामध्ये श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूल शेगाव, इंदिरा गांधी माध्यमिक शाळा, उर्दू हायस्कूल माटरगाव या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
यात राष्ट्रमाता इंदिरा गांधी हायस्कुल ४७.४१ टक्के, जी.बी. मुरारका हायस्कूल ६६.३७ टक्के, पूर्णा हायस्कूल भोनगाव ८२.३५ टक्के, अंजुमन उर्दू माध्यमिक शाळा ६७.४० टक्के, महात्मा फुले विद्यालय शेगाव ८६.८२, पाई विद्यालय जलंब ८३.५६ टक्के, जिल्हा परिषद हायस्कूल जवळा बु. ३५.४८ टक्के, महाराष्ट्र हायस्कूल जानोरी ९६.४२ टक्के, पारीजात विद्यालय मनसगाव ८०.२३ टक्के, बुरूंगले विद्यालय ७८.१४ टक्के, मैनाबाई आगरे विद्यालय टाकळी विरो ८१.८१ टक्के, वानखडे विद्यालय आडसूळ ९८.४८ टक्के, श्री संत गजानन महाराज हायस्कुल शेगाव १०० टक्के, श्री गजानन महाराज महाविद्यालय चिंचोली १६.१२ टक्के, सातपुडा माध्यमिक विद्यालय पहुरजिरा ९४.६२ टक्के, हरलालका इंग्लिश स्कूल शेगाव ९८.९८ टक्के, श्री गजाननदादा पाटील नगर परिषद उर्दू हायस्कूल शेगाव ९२.८६ टक्के, जिल्हा परिषद हायस्कूल माटरगाव ९२.१६ टक्के, संत गोमाजी महाराज माध्यमिक विद्यालय नागझरी ६४.१० टक्के, स्वामी विवेकानंद इंग्लिश ज्ञानपीठ शाळा क्र.५ शेगाव ९६.९६ टक्के, मौलाना आझाद उर्दू हायस्कूल अळसणा ७०.६८ टक्के, श्री गजानन महाराज आदिवासी आश्रम शेगाव ९१.१७ टक्के, ए.सी. गो.वि. गर्लस रेडीडेंशियल स्कुल शेगाव ७८.५७ टक्के, इंदिरा गांधी माध्यमिक शाळा शेगाव १०० टक्के, महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय माटरगाव ८०.६४ टक्के, निमाईया उर्दू हायस्कुल माटरगाव १०० टक्के, अशाप्रकारे शेगाव तालुक्यातील एकुण २६ शाळांचा निकाल ८०.२४ टक्के लागला आहे.

Web Title: 80.24 percent result in Shegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.