जिल्ह्यातील ८,२६३ फेरीवाल्यांना मिळणार दीड हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:33 AM2021-04-15T04:33:16+5:302021-04-15T04:33:16+5:30

--तालुकानिहाय फेरीवाल्यांची संख्या-- बुलडाणा जिल्ह्यात तालुकानिहाय विचार करता बुलडाणा तालुक्यात १,१७८, चिखली १,१३८, देऊळगाव राजा २९९, सि. राजा ...

8,263 peddlers in the district will get assistance of Rs | जिल्ह्यातील ८,२६३ फेरीवाल्यांना मिळणार दीड हजारांची मदत

जिल्ह्यातील ८,२६३ फेरीवाल्यांना मिळणार दीड हजारांची मदत

Next

--तालुकानिहाय फेरीवाल्यांची संख्या--

बुलडाणा जिल्ह्यात तालुकानिहाय विचार करता बुलडाणा तालुक्यात १,१७८, चिखली १,१३८, देऊळगाव राजा २९९, सि. राजा १२७, मेहकर ३५६, लोणार २५६, संग्रामपूर ४०, शेगाव ८७४, खामगाव १०१५, नांदुरा ११८८, मलकापूर १२६८, जळगाव जामोद ४४३, मोताळा ८१ याप्रमाणे फेरीवाल्यांची संख्या आहे.

--‘आत्मनिर्भर’मुळे सुलभता--

गेल्या वर्षी मिशन बिगीन अंतर्गत जिल्ह्यातील ८,२६३ पैकी ५,७०० फेरीवाल्यांना ५७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली होती. त्यामुळे बँकांकडे जिल्ह्यातील फेरीवाल्यांचा अद्ययावत डाटा बँकांकडे वर्तमान स्थितीत उपलब्ध आहे. त्यामुळे राज्य शासनाने घोषित केलेली मदत फेरीवाल्यांना वेळेत मिळावी, अशी अपेक्षा आहे.

--मदत औपचारिक न ठरावी--

केंद्राच्या आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत आर्थिक मदत मिळण्यात अडचणी आल्या. तांत्रिक अडचणीही खूप होत्या. त्यामुळे अपेक्षित वेळेत मदत मिळण्यात अडचण आली. आता तसे होऊ नये हीच अपेक्षा. गेल्या वेळी नोंदणीमध्ये अडचण आली होती.

(प्रमोद कापसे, बुलडाणा)

--मदत तोकडी--

सध्याच्या कठीण काळात ही मदत एक दिलासा ठरणारी असली तरी ती तोकडी असल्याचे वाटते. मदत वाटपात तांत्रिक अडचणी कमीत कमी याव्यात, ही अपेक्षा.

(दुर्गाबाई, बुलडाणा)

Web Title: 8,263 peddlers in the district will get assistance of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.