किती हा दारूचा महापूर, अवैध दारू विक्री विरोधात ८३ जणांवर गुन्हे; सात दुचाकी जप्त  

By ब्रह्मानंद जाधव | Published: September 26, 2023 06:52 PM2023-09-26T18:52:28+5:302023-09-26T18:52:49+5:30

अवैध दारू विक्री आणि निर्मितीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ८३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

83 cases against the sale of illegal liquor Seven bikes seized | किती हा दारूचा महापूर, अवैध दारू विक्री विरोधात ८३ जणांवर गुन्हे; सात दुचाकी जप्त  

किती हा दारूचा महापूर, अवैध दारू विक्री विरोधात ८३ जणांवर गुन्हे; सात दुचाकी जप्त  

googlenewsNext

पिंपळगाव सराई : अवैध दारू विक्री आणि निर्मितीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ८३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. किती हा दारूचा महापूर, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य उत्पादन शुल्क अमरावतीचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १ सप्टेंबरपासून एकूण ८३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये ८३ वारस गुन्हे नोंद करून ८३ आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. त्यात ९ लाख ४३ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 या कारवाईत एकूण सात दुचाकी जप्त करण्यात आली आहेत. दारूची अवैध वाहतूक तसेच विक्री व निर्मिती करू नये, जेथे अवैध दारू विक्री होते तेथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वेळोवेळी हॉटेल, ढाब्यावर धाडी टाकून गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने नुकतेच घाटनांद्रा तसेच सैलानी शिवारात दोन गुन्हे नोंदवून ५३० लिटर रसायन जागीच नष्ट केले. तसेच २८ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली.

८२१ लिटर हातभट्टी दारु जप्त
१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील विविध हातभट्टी स्पॉटवर एकूण ४१ गुन्हे दाखल करून १७ हजार १२३ लिटर रसायन जागीच नष्ट करण्यात आले आहे. ८२१ लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली. अवैध देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाया करून एकूण २६१ लिटर देशी दारू, ५३ लिटर विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्या एकूण सात हॉटेल, ढाब्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
 

Web Title: 83 cases against the sale of illegal liquor Seven bikes seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.